विविध उपक्रमातून विक्रमसिंह शिंदे यांच्या वाढदिवस साजरा
करमाळा (कटुसत्य वृत्त ) :- श्रीकमलाभवानी शुगर्स लि. चे संस्थापक चेअरमन व माढा तालुका पंचायत समितीचे सभापती मा. श्री विक्रमसिंह शिंदे यांचा 36 वा वाढदिवस आज मोठ्या आनंदी वातावरणात कमलाभवानी शुगर मध्ये पार पडला.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे डायरेक्टर संचालक डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कारखान्याच्या भव्य पटांगणामध्ये करमाळा अर्बन बँकेचे अध्यक्ष मा. कन्हैयालाल देवी, सुनील सावंत, सुजित बागल, विनय ननवरे, तुकाराम क्षिरसागर, अशपाक जमादार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,
वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन कन्हैयालाल देवी, तानाजी बापू सावंत ,विनय ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यासाठी अक्षय ब्लड बँक सोलापूरचे सहकार्य लाभले. संपूर्ण दिवसभरामध्ये एकूण 70 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
त्यावेळी कमलाभवानी कारखान्याचे इंजिनिअर चौगुले, चीफ केमिस्ट पाटील, शेती अधिकारी जगदाळे, चीफ अकाऊंटंट उबाळे, खरेदी विभागाचे कोयले, प्रशासन विभागाचे जगताप लेबर ऑफिसर बागल, स्टोअर विभागाचे सय्यद, सिव्हिल विभागाचे मिसाळ, केमिस्ट शेख, उपस्थित होते. जगदाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, प्रशासन विभागाचे जगताप यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. व सर्वांनी विक्रमसिंह,यांच्या आयुष्याला भरभरून शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
0 Comments