Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग बारा मधून संतोष कळसे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे केली उमेदवारीची मागणी

 प्रभाग बारा मधून संतोष कळसे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे केली उमेदवारीची मागणी

गत नगरपरिषद निवडणुकीत कळसे ठरले होते निर्णायक प्रचारक

मोहोळ ( कटुसत्य वृत्त ) :- गेल्या नगर परिषद निवडणुकीत राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक 12 मधून सामाजिक कार्यकर्ते संतोष कळसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संतोष कळसे हे जितके अभ्यासू अन वैचारिक तितकेच आक्रमक आणि सरळ स्वभावाचे मानले जातात. ते गेल्या अनेक वर्षापासून माजी आमदार राजन पाटील यांच्या संपर्कातील कार्यकर्ते आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांचा सातत्याने संपर्क राहीला आहे यामुळे या प्रभागात त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. गेल्या महिनाभरापूर्वी संतोष कळसे यांनी ही निवडणूक लढवण्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र प्रभाग 12 मधील अनेक जाणकार आणि सुजाण नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आपण निवडणूक लढवावी असे सुचवले आणि त्यांच्या समर्थकांची देखील त्यांनी प्रभाग 12 मधूनच निवडणूक लढवावी अशी तीव्र इच्छा होती. सुरुवातीला कळसे हे प्रभाग 12 किंवा प्रभाग क्रमांक चार मधून इच्छुक असल्याची चर्चा होती. आरक्षण सोडतीनंतर हा प्रभाग ओबीसी पुरुष झाल्याने संतोष कळसे यांना सोयीचे आरक्षण झाल्याची चर्चा झाली. त्यामुळे संतोष कळसे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार ? याबाबत देखील तर्कवितर्क लढवले जात होते. असे असताना काही दिवसांपूर्वी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जाऊन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांना भेटून पक्षाकडे रीतसर उमेदवारी अर्ज दाखल करत उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे प्रभाग 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज इच्छुकांच्या यादीत संतोष कळसे यांचे नाव देखील समाविष्ट झाल्यामुळे आता पक्षश्रेष्ठी उमेदवारीसाठी कोणाच्या नावाचा विचार करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. गत निवडणुकीच्या वेळी विद्यमान नगरसेवक प्रमोद डोके यांच्या विजयासाठी संतोष कळसे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते. त्यामुळे संतोष कळसे यांच्या उमेदवारीबद्दल राष्ट्रवादी अनुकूल असल्याची चर्चा शहरात आहे.
कळसे यांचे विकासकामांबद्दलचे मत फार स्पष्ट आहे. शिवाय राजकीय क्षेत्रावर त्यांचा प्रपंच नसल्यामुळे निस्वार्थी भावनेने ते प्रभागासाठी झटू शकतात. अशी त्यांच्या समर्थकांना खात्री झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी यासाठी दबाव वाढला होता.नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रशासन आणि सामान्य जनता यांमधील दुवा म्हणून विकासाचा अभ्यासात्मक पाठपुरावा करणाऱ्या संतोष कळसे यांच्यासारख्या नगरसेवकांची मोहोळ शहराला नितांत गरज आहे त्यामुळेच प्रभाग 12 मधून संतोष कळसे यांना आम्ही राष्ट्रवादी कडूनच निवडणूक लढवावी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू करावेत अशी मागणी केल्याचे त्यांच्या समर्थकांनी दैनिक कटूसत्यशी बोलताना सांगितले.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुरुवातीपासूनच आमच्या कळसे कुटुंबियांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय  या                             प्रभागात आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या बंधू-भगिनींचा समावेश आहे . या प्रभागाशी असलेली आपुलकीची नाळ कधीही आम्ही तुटू दिली नाही. येत्या काळात होणाऱ्या मूळ नगरपरिषदेची निवडणूक मी लढवावी म्हणून याच प्रभागातील कार्यकर्त्यांचा आग्रह दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे प्रभाग निहाय आरक्षण सोडतीनंतर 12 क्रमांक प्रभागात मी हि निवडणूक निश्चितपणे लढवण्यासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणी केली आहे

Reactions

Post a Comment

0 Comments