Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेनेच्या प्रभाग क्र. 13 च्या बालेकिल्ल्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक अमर कांबळे यांच्या नावाची निर्णायक चर्चा

 शिवसेनेच्या प्रभाग क्र. 13 च्या बालेकिल्ल्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक अमर कांबळे यांच्या नावाची निर्णायक चर्चा..

 राष्ट्रवादी, भाजपकडूनही हालचाली सुरू

                                                    

मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- मोहोळ शहराच्या पश्चिमेकडील भागातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पैकी एक असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये उमेदवारी निश्चिती वरून राजकीय डावपेचांचा प्रारंभ झाला आहे. ग्रामपंचायत काळापासून हा प्रभाग सातत्याने शिवसेनेच्या ताब्यात राहिलेला आहे.सध्या या प्रभागाचे प्रतिनिधित्व नसीमा सिकंदर बोंगे या करत आहेत. सिकंदर बोंगे हे शिवसेनेचे निष्ठावंत समर्थक मानले जातात. गत निवडणुकीच्या वेळी ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांनी बोंगे यांना उमेदवारीची संधी देत त्यांच्या सुविद्य पत्नी नसीमा बोंगे यांना उमेदवारी देत त्यांना सर्व शिवसैनिकांनी एकदिलाने झटत शिवसेनेकडून विजयी देखील केले. बोंगे यांना जरी पक्षाने संधी दिली असली तरी नगर परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता नसल्यामुळे बोंगे यांना विकास कामे करण्याबाबत मर्यादा आल्या. प्रभागात म्हणाव्यात तशा प्रमाणात निधी त्यांना खेचून आणता न आल्यामुळे प्रभागातील कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची नाराजी त्यांना पत्करावी लागली. आता हा प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे बोंगे यांना आता दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.
             आता या प्रभागातून जुने निष्ठावंत शिवसैनिक तथा उद्योजक अमर कांबळे यांचे नाव पुढे आले आहे. सत्ता असो अथवा नसो सदैव शिवसेनेसोबत राहण्याची त्यांनी घेतलेली भूमिका आजही पक्षनेते विसरलेले नाहीत.
ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड आणि बाळासाहेब गायकवाड, संजय देशमुख, सीमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर कांबळे यांनी पक्षासाठी काम केले आहे. शहराच्या पश्चिम भागात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये सातत्याने भगवा खांद्यावर घेऊन पक्षकार्य कांबळे यांनी प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने निभावले आहे.याशिवाय शहरातील ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना आणि इतर नेत्यांनाही देखील कांबळे यांनाच संधी देण्याची तीव्र इच्छा आहे. त्यामुळे आरक्षण प्रक्रियेमध्ये हा प्रभाग आरक्षित झाल्याच्या क्षणापासुन अमर कांबळे यांचे नाव शिवसेनेकडून निश्‍चित मानले जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेसाठी निरपेक्ष भावनेने काम करत आलेले एक सच्चे आणि प्रामाणिक शिवसैनिक अमर कांबळे यांना याठिकाणी उमेदवारी देण्याबाबत शिवसेना पक्ष स्तरावरून गांभीर्याने चाचपणी सुरू आहे.
                अमर कांबळे हे वीट आणि बांधकाम क्षेत्रातील एक नावाजलेले उद्योजक असून शेकडो बेरोजगारांच्या हाताला त्यांनी काम दिले आहे. याशिवाय या प्रभागात कांबळे परिवाराचा सर्वसामान्य जनतेशी अत्यंत दांडगा जनसंपर्क असल्यामुळे या प्रभागाच्या शिवसेनेच्या ताकदीमध्ये कांबळे यांचा वाटा मोठा ठरला आहे. पक्षाकडून विविध निवडणुकीमध्ये अथवा कार्यकारिणीच्या पद वाटपामध्ये संधी मिळाली नाही तरीही पक्षासोबतच राहण्याचा त्यांचा निर्णय आज निर्णायक ठरत आहे. मोहोळ शहरातील जुन्या निष्ठावंत शिवसैनिक पैकी एक असलेले अमर कांबळे यांनाच या प्रभागातून उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची प्रामाणिक इच्छा आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments