दिवंगत शिवसैनिक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मदेव गायकवाड यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न
मोहोळ ( कटुसत्य वृत्त ) :- शिवसेनेचे माजी ग्रा.प.सदस्य तथा निष्ठावंत शिवसैनिक स्व.ब्रम्हदेव आबा गायकवाड यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त ब्रह्मस्मृती प्रतिष्ठान आणि नागनाथ प्रासादिक तालीम यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तथा पचायत समितीचे माजी उपसभापती बाळसाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये तब्बल ८४ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे उदघाटन सकाळी दहा वाजता माजी सभापती बाळासाहेब गायकवाड यांच्या निवासस्थानी विविध मान्यवरांच्या उपस्थीत करण्यात आले. यावेळी अक्षय ब्लड बँकेची सर्व टीम उपस्थित होती. गेल्या १४ वर्षापासून दिवंगत शिवसेना नेते ब्रह्मदेव गायकवाड यांच्या स्मरणार्थ हे रक्तदानासारखा पवित्र आणि आदर्शवत उपक्रम गायकवाड परिवाराच्या वतीने राबविण्यात येतो.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, मोहोळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन कौशिक तात्या गायकवाड, भाजपचे मोहोळ तालुक्याचे मार्गदर्शक तथा लोकसेवक संजय अण्णा क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, पद्माकर आप्पा देशमुख, मोहोळ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, शिवसेनेचे अभ्यासू युवा नेते आणि मतदार संघाचे मार्गदर्शक नागेश वनकळसे सर,
अनिल गाडे, अमोल गायकवाड,चंद्रकांत वाघमोडे, काकाराजे भोसले, रणजीत भोसले, रणजीत गायकवाड, श्रीकांत शिवपुजे, सचिन चव्हाण,संतोष गायकवाड सर, महेश माने, महेश भैय्या आंडगे, संतोष माळी, सत्यवान देशमुख, चंदूआप्पा गोडसे, प्रभाकर दादा डोके, प्रवीण नाना डोके, महावीर डोके, नागनाथ गायकवाड, अजय दादा भोसले, शिवाजी वाघमारे इत्यादी सह सर्व क्षेत्रातील सर्व पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान वैभव(दाजी) गायकवाड,गणेश विष्णुपंत गायकवाड यांनी केले तर आभार बाळासाहेब गायकवाड व विष्णुपंत गायकवाड यांनी व्यक्त केले.
0 Comments