अकोले खुर्द ग्रा. पं. सदस्य विनोद पाटील यांच्या वतीने नूतन सरपंच व उपसरपंच यांचे सत्कार..
टेंभुर्णी ( कटूसत्य वृत्त ) :-टेंभुर्णी पासून जवळ असलेले अकोले खुर्द येथे नूतन ग्रा पं सदस्य तथा शिवसेनेचे नेते विनोद नंदराम पाटील यांच्या वतीने तांबवे (टे) ग्रामपंचायतचे पार्टी प्रमुख, नूतन सरपंच व उपसरपंच यांचे सत्काराचे आयोजित करण्यात आला.
दिपक पाटील यानी विचार मांडले स्वागत केले राजाभाऊ खटके यांनी म्हणाले अकोलेकर व तांबवे कर यांचे एक जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळले आहेत,हे ऋणानुबंध असेच पुढील काळात कायम राहतील असे सांगितले व विनोद पाटील यांची नूतन ग्रा पं सदस्य पदी निवड झाले बद्दल सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कारखान्याचे माजी संचालक दिपक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी माजी सरपंच नंदराम पाटील, श्री शंकर सह साखर कारखान्यांचे माजी संचालक दिपक पाटील, तांबवे चे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पार्टी प्रमुख नागभाऊ खटके, माजी सरपंच तथा पार्टी प्रमुख राजाभाऊ खटके, माजी उपसरपंच नागेशबापू खटके, वि.का.से.सो. चेअरमन अशोक खटके, माजी चेअरमन संतोष खटके, भजनदास खटके, तांबवे चे सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच सुजीत खटके, अकोळेचे खुर्द चे महेश पाटील, मार्केट कमेटीचे माजी संचालक संतोष पाटील, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष गणेश पाटील, अमित पाटील, बंडू सातव, रमेश पाटील, दादासो बनसोडे, संतोष मासाळ, संतोष पाटील, भारत पाटील, औदुंबर पाटील, तोडकर, राहुल देवकर, अमोल पवार, नवनाथ नरसाळे, आप्पा पाटील,दत्तू पाटील, काकासो देवकर, दिगंबर पाटील, तांबवे चे विजय खटके अध्यक्ष व्यसनमुक्त संघटन माढा तालुका, समीर तांबोळी सदस्य, किरण जाधव सदस्य, सागर खटके अध्यक्ष हिंदवी स्वाराज्य ग्रुप तांबवे, सचिन तळेकर, सचिन तळेकर, शुभम खटके व तांबवे गावतील सर्व तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद पाटील युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments