विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार बबनदादा शिंदे तर उपाध्यक्षपदी वामन भाऊ उबाळे बिनविरोध..
टेंभुर्णी ( कटूसत्य वृत्त ) :- माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार बबनदादा शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी वामन भाऊ उबाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा निबंधक कुंदन भोळे यांनी जाहीर केले .
वृत्तांत असा की सन 2021 ते 2026 या कालावधीसाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या जाहीर झालेल्या निवडणुकीत 21 संचालकाच्या जागेसाठी 21 जणांचे अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध निवड झाली म्हणून घोषित झाले होते. आज झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी बबनराव विठ्ठलराव शिंदे यांचा अध्यक्षपदासाठी तर वामन प्रल्हाद उबाळे यांचा उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडी बिनविरोध झाल्या असल्याचे घोषित केले व त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आमदार बबनराव शिंदे म्हणाले की कारखान्याच्या आजपर्यंतच्या मागील वीस वर्षांच्या इतिहासात ही चौथी बिनविरोध निवडणूक आहे .कारखान्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत .साखर उद्योगाला संपूर्ण देशात अतिशय अडचणीच्या काळात तून संक्रमण करावे लागत आहे, तरीपण या कारखान्याने प्रतिदिनी 2500 टनापासून 12 हजार मेट्रिक टन गाळपक्षमते पर्यंत झेप घेतली असून वीज निर्मिती, आसवानी प्रकल्प, झिरो पोलुशन ,यांच्यासहित अनेक सामाजिक उपक्रम राबवून कारखान्याचा नावलौकिक कायम अबाधित ठेवला आहे. त्यामुळे आर्थिक टंचाई असून देखील चालू गळीत हंगामातील 30 जानेवारीपर्यंत उसाची शेतकऱ्याची 2000 रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे ची बिले दिलेली आहेत व 15 फेब्रुवारी पर्यंत झालेल्या गळीत उसाचे आठ दिवसात बील पोहोच होणार आहेत ., कारखान्याची एफ आर पी 2375 रुपये आहे. आज पर्यंत पिंपळनेर युनिटी एक व करकंब युनिट दोन मधून 19 लाख टन उसाचे गाळप झाले आहे., साखरेचे भाव वाढणे गरजेचे आहे तरच साखर धंदा व्यवस्थित चालणार आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या उन्नती, प्रगतीसाठी आणि आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कारखाना सदैव प्रयत्नशील राहील हे निश्चित. उपाध्यक्ष वामन भाऊ उबाळे याप्रसंगी म्हणाले की सिना नदीकाठचा एक सामान्य शेतकरी, राज्यातील एका नामांकित साखर कारखान्याचा उपाध्यक्ष होतो ही सर्व आमदार बबनदादा शिंदे यांची मेहरबानी असून मी त्यांचा व तुम्हा सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी प्रस्तावना मध्ये कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली होती, सर्वांच्या सहकार्याबद्दल जिल्हा निबंधक यांचे सहित नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व 21 संचालक व कारखान्यातील विभाग प्रमुख तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
0 Comments