Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षि साखर कारखान्याचा सन २०२०-२०२१ मधील ऊस गळीत हंगामाचा सांगता

 सहकार महर्षि साखर कारखान्याचा सन २०२०-२०२१ मधील ऊस गळीत हंगामाचा सांगता 


अकलुज ( कटूसत्य वृत्त ) :- अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२०२१ च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ रविवार दि.२८/०२/२०२ रोजी दुपारी ४:०० वाजता संपन्न झाला.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक य महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री. विजयसिंह  शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन .जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
सांगता समारंभानिमित्त दुपारी ४:०० वाजता आयोजित केलेली श्री सत्यनारायण महापूजा ऊस तोडगी वाहतूक वाहन मालक .विनायक काशिनाथ केचे व त्यांच्या सुविद्य पत्नी नंदादेवी विनायक केचे या उभयतांचे हस्ते संपन्न  झाली .
सदर सिझन गारदीरितीने पार पाडण्यामध्ये कारखान्याचे मार्गदर्शक संचालक । महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील व चेअरमन  जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच कारखान्याचे संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद व वाहतूकदार, ऊस तोडगी मुकादम, मजूर तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी केलेल्या सहकार्यामुळे सिझन २०२०-२०२१ मध्ये दि.२७/०१/२०२१ अखेर १ लाख ९३ हजार ८८२ मे.टन ऊसाचे गाळप होऊन १० लाख ५२ हजार ५०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे.तसेच को-पानरेशन प्रकल्पामध्ये ८ कोटी ५५ लाख ४३ हजार ०३१ युनीट बीज निर्माण होन ५ कोटी ३६ लाख २३ हजार २३२ युनिट वीज एक्सपोर्ट (विक्री) केलेली आहे. तसेच चालू सिझनमध्ये उपपदार्थ प्रकल्पातील डिस्टीलरीमध्ये दि.२७/०२/२०२१ अखेर ९० लाख ९४ हजार ८१७ लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच ६० लाख ५८ हजार ३२३ लिटर्स इथेनॉल  उत्पादन झाले आहे. तसेच अॕसिटीक अॕसिड प्रकल्पामध्ये ७२७ मे.टन अॅसिटाल्डीहाईड व ७७३ मे.टन अॅसिटीक असिडची निर्मिती झाली आहे. त्याबद्दल कारखान्याचे संचालक मंडळाचे वतीने कार्यकारी संचालक  राजेंद्र केरबा चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले व पुढील सिझनमध्ये असेच सहकार्य करणविषयी विनंती केली.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे कार्यकारी संचालक व खातेप्रमुख उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments