मोहोळच्या हार्डवेअर क्षेत्रातील व्यापारी बाहुबली कवठे यांचे निधन
मोहोळ ( कटू सत्य वृत्त ) :- येथील प्रसिद्ध व्यापारी व व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाहूबली शांतिनाथ कवठे यांचे अल्पशा आजाराने
सोलापूर येथील मार्कंडेय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना निधन झाले.मोहोळ शहरातील सर्वात जुने आणि प्रथितयश व्यापारी आणि उपक्रमशील बागायतदार असलेले कवठे यांच्या निधनाची वार्ता समजताच नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अण्णा नावाने शहर आणि तालुक्यात परिचित असलेल्या कवठे यांचा जनसंपर्क मोठा होता. मनमोकळा स्वभाव आणि मित्रमंडळींना सदैव मोलाची साथ देणारे सहृदयी व्यक्तिमत्व असलेले कवठे हे मोहोळ शहरातील शेकडो लघु उद्योजकांचे मार्गदर्शक होते.सोलापूर येथे आज उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. बी. एस. कवठे उद्योग समूहाचे ते आधारवड आणि सर्वेसर्वा होते. बाहुबली कवठे यांच्या अचानक दुःखद निधनाने मोहोळ शहर आणि तालुक्यातील बाजारपेठेवर शोककळा पसरली आहे.मृत्युसमयी त्यांचे वय ५३ होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले , एक मुलगी , दोन भाऊ , सहा बहिणी , असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी सोलापूर येथे करण्यात आला .
0 Comments