Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगरपरिषदेची आरक्षण सोडत अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. माजी नगराध्यक्ष सरिता सुरवसे सोडती बाबत राष्ट्रवादीचेच दोन माजी नगराध्यक्ष आले आमने सामने

मोहोळ नगरपरिषदेची आरक्षण सोडत पार पडली. . माजी नगराध्यक्ष सरिता सुरवसे  सोडती बाबत राष्ट्रवादीचेच दोन माजी नगराध्यक्ष आले आमने सामने

मोहोळ (कटूसत्य वृत्त ) :- प्रशासनात व मोहोळच्या जनतेत संभ्रम निर्माण करून मोहोळ नगर परिषदेच्या आरक्षण सोडती संदर्भात विनाकारण काहीजण राजकीय स्वार्थासाठी हरकती घेत आहेत. मात्र अशा लोकांना मोहोळ मधिल सुज्ञ जनता चांगलीच ओळखून आहे. हरकत घेणाऱ्यांनी संभ्रम निर्माण करण्यापेक्षा गेल्या पाच वर्षात काय काम केले याचे अगोदर मोहोळ शहरवासीयांना उत्तर द्यावे मगच बोलावे असे कडवे टिकास्त्र मोहोळ नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सरिता संतोष सुरवसे यांनी सोडले.
मोहोळ नगरपरिषदेच्या आरक्षण सोडती संदर्भात त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी यांच्या समोर अत्यंत पारदर्शक पद्धतीने झालेल्या आरक्षण सोडती बाबत विनाकारण काही लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हरकती घेत आहेत. त्यांनी केलेल्या त्या तक्रारीमध्ये काहीही तथ्य नाही. केवळ स्वतःसाठी अथवा कुटुंबातील सदस्यांसाठी सुरक्षित वार्ड नसल्याने इतर वार्डामध्ये आपला निभाव लागणार नाही या भावनेने तेथील आरक्षणाबाबत अक्षेप घेण्याचे काम करत आहेत. मात्र प्रशासनाचा आणि मोहोळच्या सुज्ञ जनतेचा यामुळे निश्चितच संभ्रम निर्माण होणार नाही. प्रांताधिकार्‍यांनी रीतसर केलेल्या आरक्षण सोडतीमध्ये पारदर्शकपणा आहे. त्याबाबत जर कोणी आक्षेप घेतला तर सदर प्रक्रियेच्या विरोधात आम्ही देखील उच्च न्यायालयात निश्चित दाद मागू असेही माजी नगराध्यक्ष सरिता सुरवसे या वेळी बोलताना म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोष सुरवसे, अण्णा फडतरे यावेळी उपस्थित होते.
       मोहोळ नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय क्षेत्रातून हरकती घेण्यास सुरुवात झाल्यानंतर मोहोळच्या माजी नगराध्यक्षा सरिता सुरवसे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मोहोळ शहराच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्याच एका गटाने याबाबत हरकती घेतल्या आहेत तर राष्ट्रवादीच्या दुसरा गट मात्र या सोडती अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडल्या आहेत असे प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचेच दोन माजी नगराध्यक्ष आरक्षण सोडतीनंतर एकमेकाच्या आमने-सामने आल्यामुळे येत्या काळात निवडणुकीत आणखी काय काय राजकीय घडामोडी घडणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments