Hot Posts

6/recent/ticker-posts

खर्गतिर्थ ते बिरलिंग मंदिर व घाटणे रस्ता ते नागचिंच मंदिर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी केली जिल्हाधिकार्‍यांकडे काम थांबवण्याची मागणी

खर्गतिर्थ ते बिरलिंग मंदिर व घाटणे रस्ता ते नागचिंच मंदिर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार
नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी केली जिल्हाधिकार्‍यांकडे काम थांबवण्याची मागणी

मोहोळ (कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ नगरपरिषद हद्दीतील खर्गतिर्थ ते बिरलिंग मंदिर व घाटणे रस्ता ते नागचिंच मंदिर या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम चालू असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. सध्यस्थितीत घाटणे रस्ता व्यवस्थित असताना शासनाच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निकृष्ट रस्त्याचे काम थांबवावे अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
सध्या होत असलेली कामे हे सर्वांकडून संकलित झालेल्या करामधूनच होत आहेत. त्यामुळे आलेला निधी हा कोणत्या पक्षाचा नसून तो सर्वसामान्य जनतेचा आणि शासनाचा आहे. त्यामुळे या निधीतून पारदर्शक दर्जाची कामे होण्यासाठी मी सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. या पुढील काळातही टोकाचा संघर्ष जरी झाला तरी चालेल मात्र निकृष्ट दर्जाची कामे आम्ही होऊ देणार नाही. मोहोळ शहरातील निकृष्ट दर्जाच्या कामांमधून शहरापेक्षा स्वतःचा प्रपंचाचे भले करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे तो आम्ही हाणून पाडू अशीही घोषणा सत्यवान देशमुख यांनी केली.
        मोहोळ शहरातील इतर रस्त्यांची अवस्था बिकट असताना केवळ पैशाच्या हव्यासापोटी हा घाटणे रस्ता डांबरीकरण केला जात आहे. डांबरीकरण रस्त्यांवर फक्त दगड-खडीचा एकच थर देऊन रस्ता करण्यात येत आहे.
या रस्त्याच्या कामासाठी मोहोळ नगरपरिषदेने ४६ लाख ६९ हजार ९०० रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. या रस्त्यालगत श्री क्षेत्र नागनाथ महाराज मंदिर असल्याने हा रस्ता सातत्याने वर्दळीचा आहे. तसेच या परिसरात यात्रेदरम्यान मोठी गर्दी होते. लोकांच्या दृष्टीने मोठे तीर्थक्षेत्र असल्याने नगरपरिषदेने या रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला असताना हा रस्ता निकृष्ठ दर्जाचा करण्यात येत आहे. या ठिकाणच्या रस्त्याचे काम करत असताना अंदाजपत्रकानुसार तसेच संबंधित विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार काम होत नाही. खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी अंदाजपत्रकानुसार खडीकरण करण्यापूर्वी ०.३० मी. उंचीचे खोदकाम करणे गरजेचे असताना कोणत्याही प्रकारचे खोदकाम न करता आहे त्याच डांबरी रस्त्यावर खडी टाकून रस्ता तयार केला जात आहे. या रस्त्याच्या कामाचे तात्काळ चौकशी करून होत असलेले निकृष्ट काम थांबवण्याच्या मागणीचे निवेदन शिवसेनेचे नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी नगरपरिषद प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
         आमचा कामाला विरोध नाही, मात्र या रस्त्याचे काम हे दर्जेदार आणि टिकाऊ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरू असलेले निकृष्ट काम थांबवण्यासाठी प्रसंगी नगर परिषदेसमोर आंदोलनही करणार आहे.

सत्यवान देशमुख, नगरसेवक मोहोळ 

Reactions

Post a Comment

0 Comments