वीज कनेक्शन तोडल्यास एमआयएम तीव्र आंदोलन करणार फारूक शाब्दी यांचा महावितरणला इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महावितरणने शहरातील वीज कनेक्शन तोडण्याचा धडका लावला आहे. हे अन्यायकारक आहे. कोरोना आणि लॉकडाऊच्या काळात नागरिकांना भरमसाठ मोठी वीज बिले पाठवण्यात आली आहेत. अगोदर महावितरणने ती वीज बिले दुरूस्त करून पाठवावीत. तोपर्यंत नागरिकांचे वीज कनेक्शन तोडू नये, अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी महावितरणला दिला.
महावितरणचे अधीक्षक अभियत्यांना दिलेल्या निवेदनात शाब्दी यांनी म्हटले आहे की, गेल्या 10 महिन्यात ज्यांनी वीज बिल भरले नाही त्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. ही मोगलशाही आहे. अधिच कोरोनाच्या संकटामुळे नागरिक आर्थिक अडचणीत असताना वीज तोडणे म्हणजे त्यांना आणखी संकटात टाकण्यासारखे आहे. कोरोना काळात महावितरणने भलीमोठी वीज बिले पाठवली आहेत. ती दुरूस्त करून पाठवावीत. तोपर्यंत कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नये, ज्यांचे कनेक्शन तोडले आहेत ते लवकर जोडावीत, फॉल्टी मीटर चेक करून दुसरी बसवावीत, वीज कनेक्शन कट केल्यानंतर दंड वसूल करू नये नागरिकांना वीज बिल टप्प्याटप्प्यात भरण्याची सुविधा द्यावी असेही शाब्दी यांनी म्हटले आहे.
यावेळी युवा अध्यक्ष मोहसीन मैंदर्गिकर, अश्फाक बागवान, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा मुल्ला, युवा कार्याध्यक्ष मोईन शेख, इक्बाल पठान हारीस शेख , याकुब एम. आर. आदी उपस्थित
0 Comments