Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रशासनाने क्रीडा संकुलाच्या जागेबाबत एकही लेखी प्रस्ताव शासनाकडे दिला नाही.

 प्रशासनाने क्रीडा संकुलाच्या जागेबाबत एकही लेखी प्रस्ताव शासनाकडे दिला नाही. नागेश वनकळसे

मोहोळ मधील लहान मुले ही निवेदन देन्यासाठी सरसावली


मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ चे क्रीडा संकुल जागेअभावी राखडले  असून गेल्या वर्षांपासून राखडलेला असून याला राजकीय आणि प्रशासकीय अनास्था कारणीभूत आहे यावर प्रशासनाने आठ दिवसात काढावा अन्यथा  या गोंधळा विरोधात हलगीनाद आंदोलन करणार असल्याचे मत मोहोळ तालुक्याचे शिवसेनेचे युवा  नेते नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.
           याबाबत सविस्तर आपली भूमिका स्पष्ट करताना वनकळसे म्हणाले की कॅबिनेट क्रीडा मंत्री ना.सुनील केदार यांनी दिनांक ४/११/२०२० रोजी क्रीडा संकुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत परंतु आज  चार महिने उलटून गेले तरी मोहोळ शहरातील एकही लिखित प्रस्ताव शासन दरबारी अद्याप गेलेला नाही याची खात्री आम्ही क्रीडा मंत्रालयाकडे केलेली आहे त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून जागेअभावी जे क्रीडा संकुल रखडले आहे त्यासाठी लागणाऱ्या एकाही शासकीय जागेचा प्रस्ताव अद्याप शासनाकडे न देणे म्हणजे मोहोळवासीय आणि तालुक्यातील  क्रीडाप्रेमीची ही फसवणूक आहे आणि अधिकाऱ्यांनी शुद्ध अंतःकरणाने आपले काम करण्याचे आवाहन यावेळी केले.
            जागेच्या उपलब्धतेची आणि प्रस्तावाची माहिती सांगताना  वनकळसे म्हणाले की मोहोळ शहरालगत जागेची उपलब्धता आहे त्यासंबधीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविणे  महत्वाचे आहे यामध्ये मोहोळ रेल्वे स्टेशन जवळ संपदा विभागाची, पुणे सोलापूर जवळ कृषी विभागाची, मोहोळ नरखेड रोडला  गायरान जमीन या चार जागेचे प्रस्ताव आम्ही सर्व पक्षीय लोक  आणि सामाजिक मान्यवर आम्ही मंजूर करून आणू, त्यामुळे  प्रस्ताव पाठवावा अन्यथा हलगीनाद आंदोलन  करणार असल्याचे नागेश वनकळसे म्हणाले.
       यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख  अशोक भोसले , नगरसेवक सत्यवान देशमुख, केशव वाघचवरे यांच्यासहित लहान मुलांच्या असणारे शिष्टमंडळ त्यामध्ये सार्थक लखदिवे, यशवर्धन वनकळसे,  प्रणव झाडे, विराज सुळ, प्रदीप भोसले, अभिजीत खरात, सुमित सुतार, अंशू शिंदे, प्रांजली झाडे  या बाल खेळाडूंनी  क्रीडा संकुलाच्या मागणीसाठी विशेष लक्ष वेधले


Reactions

Post a Comment

0 Comments