आ. दिपकआबांकडून स्व. सदाशिव पाचपुते यांना आदरांजली
सांगोला (कटुसत्य वृत्त ) :- श्रीगोंदा जि अहमदनगर येथील राजकारण, समाजकारण, आणि सहकार क्षेत्रातील एक जाणकार नेतृत्व म्हणून नेहमी पडद्यामागे राहून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे त्यांचे जेष्ठ बंधू स्वर्गीय सदाशिव भिकाजीराव पाचपुते यांचे नुकतेच दुख:द निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ. दिपक साळुंखे पाटील यांनी काष्टी, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथे मंगळवार दि. 2 मार्च रोजी स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांचे चिरंजीव सुदर्शन पाचपुते सागर पाचपुते हे उपस्थित होते आ. दिपक यांनी पाचपुते कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचीही भेट घेतली. स्वर्गीय सदाशिव यांच्या अकाली निधनामुळे फक्त अहमदनगर जिल्ह्याची नव्हे तर राज्यभरातील असंख्य कार्यकर्त्यांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. तसेच त्यांच्या निधनामुळे राजकारण समाजकारण आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची खंतही यावेळी आ. दिपक यांनी व्यक्त केली. व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य व साळुंखे-पाटील कुटुंबीयांच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण केली.
स्व.सदाशिव पाचपुते यांनी नेहमीच पडद्यामागे राहून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारण, आणि सहकार क्षेत्रावर सदाशिव यांचा विशेष प्रभाव होता. स्व. सदाशिव पाचपुते हे भारतीय जनता पार्टीचे सांगोला तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार यांचे सासरे होते. यामुळे नेहमीच पाचपुते कुटुंबीयाचे सांगोला तालुक्याशी सलोख्याचे संबंध राहीले आहेत. सदाशिव यांच्या अकाली निधनाने संपूर्ण अहमदनगर जिल्हा आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.
0 Comments