मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष सहकार्याने मोहोळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील विविध विकास कामांसाठी नगरसेविका तथा माजी सरपंच सीमा पाटील यांनी खेचून आणलेल्या चार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ गुरुवार दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता समर्थ नगर परिसरात होणार आहे. अशी माहिती शिवदीपक प्रतिष्ठानचे संस्थापक तथा शिवसेनेचे युवा नेते शिवरत्न गायकवाड यांनी दिली.
मोहोळचे श्रद्धास्थान श्री सिद्ध नागेश मंदिराचे राजेंद्र खर्गे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या विकास कामांचे उदघाटन शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या शुभहस्ते समर्थ नगर परिसरात होणार आहे. कोरोना सारख्या आव्हानात्मक परिस्थितीत शासनाने घालून दिलेल्या नियमात आणि सोशल डिस्टंसिंग पाळूनच हा कार्यक्रम मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे असेही यावेळी शिवरत्न गायकवाड म्हणाले.
गत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांना रस्ते पाणी आरोग्य या समस्यासाठी आणि इतर जीवनावश्यक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याचा शब्द सीमा पाटील यांनी दिला होता. त्यामुळे फक्त बोलूनच नाही दाखवायचे तर करून दाखवायचे अशी कार्यपद्धती असलेल्या सीमा पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 15 हा सर्वांगीण विकास कामे करणारा एक आदर्श प्रभाग बनवला आहे असेही यावेळी शिवरत्न गायकवाड म्हणाले.
या उद्घाटन समारंभ दरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, शिवसेना संघटक संजय देशमुख,ज्येष्ठ शिवसेना मार्गदर्शक नागनाथ क्षीरसागर, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख राजरत्न गायकवाड, रणजीत गायकवाड, गटनेते महादेव गोडसे, शहर प्रमुख विक्रम देशमुख,नगरसेविका नसीमा बोंगे, अनिता सोनटक्के, राणी गोडसे, सत्यवान देशमुख, नागेश वनकळसे, विजय डोके .,संजय डोके, सुधाकर डोके, मुकुंद अवताडे पोपट आतकरे,महादेव डोके, समाधान फराटे, महादेव इंगळे, सुनील गायकवाड, संजय मोरे, डॉ. संग्राम गायकवाड, अमर कांबळे, नागनाथ गायकवाड, दिलीप गायकवाड, सदा होनमाने,किरण शिंदे, नागेश थिटे, मुन्ना झुंजार, रत्नाकर डोके, कबीर कोरबु, नंदा गोरे,दत्ता घोडके, महाविर काकडे, गणेश गावडे, सोमेश क्षीरसागर, संतोष माळी, महमद शेख,अभिजीत पवार,संतोष शिरसकर, अरुण जाधव, अशोक गायकवाड, मुबारक शेख, सोमनाथ पवार, दीपक देशमुख, यांच्यासह प्रभाग क्रमांक १५ आणि १४ मधील सर्व स्तरातील नागरिक आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.
यावेळी उदघाटन होणारी विकासकामे :-
१ ) जि.प.शाळा ते व्हाया गव्हाणे घर ते पवार वायरमन घर रस्ता डांबरीकरण करणे . २ ) विजापूर रोड ते संजय मोरे घर रस्ता काँक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे . ३ ) निंबाळकर घर ते व्हाया पाटील घर ते एम.एस.ई.बी. कंपाऊंड रस्ता काँक्रीटीकरण करणे व गटार वांधकाम करणे ४ ) एम.एस.ई.बी.कंपाऊंड ते फराटे घर रस्ता डांबरीकरण करणे . ५ ) विजापूर रोड ते अब्दूल शेख घर रस्ता डांबरीकरण करणे , ६ ) फराटे घर ते डोके घर रस्ता डांबरीकरण करणे . ७ ) जिलानी घर ते डोके वस्ती रोड ते भारत काळे घर रस्ता डांबरीकरण करणे . ८ ) चौरे घर ते डोके वस्ती रोड ते नाना गायकवाड घर रस्ता डांबरीकरण करणे . ९ ) मांडवे घर ते शेटे घर ते भोसले घर ते थोरात घर रस्ता काँक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे . १० ) विजापूर रोड ते मुरारजी पठाण घर रस्ता डांबरीकरण करणे . ११ ) खंदारे घर ते खत कारखाना रस्ता डांबरीकरण करणे , १२ ) वनकळस घर ते गवळी घर रस्ता काँक्रीटीकरण करणे . १३ ) विजापूर रोड ते काका भोसले घर रस्ता डांबरीकरण करणे . १४ ) विजापूर रोड ते शरद माने घर रस्ता डांबरीकरण करणे . १५ ) थोरात घर ते मांढरे घर रस्ता काँक्रीटीकरण करणे . १६ ) विजापूर रोड ते शेख वस्ती रोड डांबरीकरण करणे . १७ ) क्रांती नगर व समर्थ नगर येथे काँक्रीटीकरण करणे . १८ ) एम.एस.ई.बी.कंपाऊंड खांडेकर घर रस्ता काँक्रीटीकरण करणे .
जिथे जिथे विकासाचा प्रश्न गंभीर असतो तिथे तिथे फक्त आणि फक्त शिवसेनाच पक्ष खंबीर असल्याचे गेल्या वीस वर्षात संपूर्ण मोहोळ शहराला शिवसेनेने दाखवून दिले आहे. गत नगर परिषद निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष हा शिवसेनाच आहे. नगरपरिषदेत सत्तेत जरी नसलो तरी राज्यात सत्ता असल्यामुळे सर्व जेष्ठ शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शक पाठबळावर आणि जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या सहकार्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मधील विकास कामांसाठी चार कोटींचा निधी मंजूर करून आणला. करोनाच्या कालावधीमुळे या कामांचे मंजुरी आणि मान्यतेसाठी काहीसा विलंब लागला. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला प्रभाग क्रमांक पंधरा हा प्रभाग शहरातील विकासात्मक दृष्ट्या आदर्श प्रभाग ठरत आहे याचा मला अभिमान वाटतो. या प्रभागातील सर्वसामान्य बंधू-भगिनी दिलेली विकासाच्या संधीचे सोने केवळ आणि केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या मार्गदर्शक नेत्यांमुळेच करू शकले. यापुढील काळातही संपूर्ण मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी वचनबद्ध राहणार आहे.
सीमा पाटील
प्रभाग क्रमांक 15 शिवसेना नगरसेविका
0 Comments