बार्शी काँग्रेसच्या वतीने शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ एक दिवशीय उपोषण
प्रतिकात्मक पेट्रोल पंपाच्या यंत्राद्वारे दरवाढ निषेधार्थ निदर्शने
बार्शी (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांवर लादलेल्या तीन काळ या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मागील शंभर दिवसापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तसेच पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून नूतन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारले होते. याचाच एक भाग म्हणून बार्शी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवाडी यांच्या नेतृत्वाखाली बार्शी येथे एक दिवसाचे उपोषण आयोजित करण्यात आले.
बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. जीवन दत्त आरगडे यांनी बार्शी येथे काँग्रेस कार्यालयासमोर या आंदोलनाचे आयोजन करताना चक्क प्रतीकात्मक पेट्रोल पंपाची उभारणी केली. दोन पेट्रोल पंपाच्या यंत्रावर ती भाजपाशासित काळात झालेली पेट्रोल पेट्रोल दरवाढ व काँग्रेसशासित काळामध्ये असलेले पेट्रोलचे दर हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. आंदोलनस्थळी गॅस टाक्या ठेवून त्यावर काँग्रेस काळातील दर व भाजप काळातील वाढलेले दर दर्शवून उपस्थितांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष निखील मस्के व युवा नेते तथा नूतन युवक शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केले.
यावेळी बोलताना ॲड.आरगडे यांनी भाषणा वेळी देशात भांडवलदारी राजवट असून खरी लोकशाही संपुष्टात आलेली आहे. कोरोना महामारी ही कृत्रिम आणि मानवनिर्मित असून यामध्ये सुद्धा सरकारी मोठ्या संस्था भांडवलदार यांच्या घशात घालण्यासाठी आखलेले हे राष्ट्रीय कारस्थान असून या मागे मोदी शाह यांचा काही हात आहे का याबाबत शंका घेण्यास वाव आहे. क्रूड आईलचे दर गगनाला भिडले असताना पेट्रोल डिझेल दर जमिनीवर ठेवण्यात मनमोहन सिंग सरकार यशस्वी होते याउलट क्रूड ऑइल दर जमिनीवर आले असताना पेट्रोल डिझेल दर गगनाला भिडले आहेत, हे मोदी सरकारचे अपयश आहे, पुतना मावशीचे प्रेमाचे अच्छे दिन, आणि विकासाचा बागुलबुवा,दाखवून देश रसातळाला घालवून विकास ऐवजी विका अशी भूमिका असलेल्या मोदी प्रणित केंद्र सरकारवर ॲड. आरगडे यांनी सडकून टीका केली.
यावेळी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने शहर अध्यक्ष राजेंद्र गायकवाड तसेच अन्य संघटना यांनी सदर आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी दत्ताजी गाढवे, बार्शी शहर अध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे, तालुका कर्याध्यक्ष तानाजीराव जगदाळे, सतीश पाचकुडवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष वसीमभाई पठाण, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष राकेश नवगिरे, जिल्हा आरोग्य सेलचे अध्यक्ष वहाबभाई पठाण, शहर उपाध्यक्ष माजी प्राचार्य भिमराव राजगुरू, निलेश नाना मांजरे पाटील, काँग्रेस प्रणित ओ.बी.सी.शहर अध्यक्ष विजय ठाकूर, ज्येष्ठ काँग्रेस नेते बबुवान आबा धावारे, यांनी समयोचीत भाषणे केली यावेळी काँग्रेस सोशल मीडिया समन्वयक ॲड. निवेदिता आरगडे, महिला शहर अध्यक्ष सुनिताताई गायकवाड, तालुका अध्यक्ष शिलाताई हिंगे, महिला जनरल सेक्रेटरी अनिता बारंगुळे, वनिता नाईकवाडी, आदि उपस्थित होते.
0 Comments