फडणवीस सरकार मधील घोटाळे बाहेर काढा - रोहन सुरवसे पाटील
माध्यमांशी बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की सध्याच्या सरकारमध्ये एकापाठोपाठ एक प्रकरणे पुढे येत आहेत. धनंजय मुंडे, संजय राठोड, अनिल देशमुख यांच्या प्रकरणाने सर्वसामान्य नागरिकांचे डोके चक्रावून गेले आहेत. कोरोना, गारपीट, अवकाळी पाऊस, यामुळे जनता, शेतकरी बांधव हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा ठोस निर्णय घेण्यात आला नाही. उलट सर्वसामान्य नागरिक शेतकरी बांधव यांच्या माथी लॉक डाउन मधील वीज बिले मारण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोपटा सारखे बोलतात आणि पुढे अचानक शांत होतात. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेने काय समजायचा? त्यांचे सरकार असताना भाजप नेत्यांची मंत्र्यांची भ्रष्ट कारभाराबाबत नावे पुढे आले होते. त्यांची ठाकरे सरकारने चौकशी लावावी अशी मागणी सर्वसामान्य जनता आता करू लागली आहे.
0 Comments