सर्वात जास्त निधी खेचून आणणार्या राष्ट्रवादीकडे इच्छुक उमेदवारांचा ओढा
आ. यशवंत माने आणि अजिंक्यराणा पाटील ठरणार मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील स्टार प्रचारक
मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता अधिकच गती येताना जाणवत आहे राष्ट्रवादी शिवसेना भाजप आणि काँग्रेस या प्रत्येक पक्षाने आपापली पक्षीय व्यूहरचना मोठ्या जोमाने सुरू केली आहे.
मोहोळचे विद्यमान आ. यशवंत तात्या माने यांनी राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून तब्बल दहा कोटी रुपयांचा विशेष निधी मोहोळ शहराच्या इतिहासात प्रथमच नगरपरिषदेला उपलब्ध करून दिला.राष्ट्रवादीचे युवा नेते बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांच्याकडे अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून आपापल्याला स्तरावर प्रभागातून उमेदवारीची मागणी केली आहे.माजी आ. राजन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मोहोळ शहराच्या राजकारणावर चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. तर विद्यमान आ. यशवंत माने यांनी दर शुक्रवारी मोहोळ विश्रामगृहावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मतदार बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यावर भर दिला आहे. मोहोळ शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक संघटित फळी मोहोळ शहराच्या विकासासाठी तयार करून त्या माध्यमातून मोहोळ शहराच्या कानाकोपऱ्यातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला.
सध्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आधारवड शरदचंद्र पवार यांच्या अनुभवी आणि धुरंधर नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात विकास कामांचा झंझावात सुरू आहे. सलग तिसऱ्यांदा पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याची किमया साध्य करणारे माजी आ. राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याने त्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात मोहोळ तालुक्याचा आणि शहराचा विकास करण्यासाठी खंबीरपणे पाऊले उचलली आहेत. मोहोळ शहरासाठी जास्तीत जास्त प्रमाणात निधी वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून खेचून आणण्याची जबाबदारी आ. यशवंत माने यांनी स्वीकारली आहे. यामुळे निश्चितपणे आ. यशवंत माने हे येत्या काळात मोहोळ शहराचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करणार याची खात्री आता अनेकांना वाटत आहे.काही नगरसेवकांनी विकास कामाच्या बाबतीत निराशा केली असली तरी बहुतांश नगरसेवकांनी दर्जेदार आणि चांगली विकासकामे आपापल्या प्रभागात केल्यामुळे राष्ट्रवादी हा शहरात मोठा जनाधार असणारा पक्ष ठरला आहे. .त्यामुळे मोहोळ शहराच्या जवळपास सर्वच प्रभागातून अनेक युवकांनी राष्ट्रवादीकडूनच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची संख्या असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एक भक्कम पक्ष म्हणून मोहोळच्या राजकारणात अधोरेखित होत आहे.आ. यशवंत माने यांनी पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार संपर्क साधून मोहोळ नगरपरिषदेला जिल्हा नगर विकास प्रशासनाकडून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे मोहोळ शहरात जवळपास 60 कोटींची विकासकामे पूर्ण होत आली आहेत. यामुळे येत्या काळात मोहोळ शहराला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही वेळोवेळी आ. यशवंत माने यांनी दिली. त्यामुळे या नगर परिषद निवडणुकीत सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू न देणाऱ्या आ. यशवंत माने यांच्या विकास कार्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनीही मोहोळ शहराच्या राजकारणावर चांगलेच लक्ष केंद्रित केल्याने राष्ट्रवादीने निवडणूकपूर्व वातावरणात आघाडी घेतली आहे.
केवळ एका वर्षाच्या काळातच आ. यशवंत माने यांनी जवळपास 400 कोटींची विकासकामे मोहोळ विधानसभा मतदारसंघात खेचून आणले आहेत. त्यामुळे आ. राजन पाटील यांनी दिलेल्या संधीच खऱ्या अर्थाने सोने आ. यशवंत माने यांनी केले आहे. त्यामुळे मोहोळ शहराच्या राजकारणात माजी आ. राजन पाटील आणि विद्यमान आ. यशवंत माने यांची जोडी निश्चितपणे सरस ठरताना दिसत आहे. मोहोळ शहराच्या भविष्यातील विकासासाठी माजी आ. राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आ. यशवंत माने हे सातत्याने प्रयत्नशील असल्याने ते एक आश्वासक नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीच्या प्रचारात आमदार यशवंत माने हे नक्कीच स्टार प्रचारक ठरतील यात तिळमात्र शंका नाही.
0 Comments