Hot Posts

6/recent/ticker-posts

वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


 सोलापूर (कटुसत्य वृत्त ) :- केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयातर्फे वयोवृद्धासाठी काम करणाऱ्या संस्थाव्यक्ती यांना पुरस्कार देण्यात येणार असून संबंधितांनी १० मार्च २०२१ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे.

            दरवर्षी १ ऑक्टोबर जागतिक वृद्ध नागरिक दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त वयोवृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्थाव्यक्ती यांना विविध प्रवर्गात वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या पत्रात असलेल्या अटीनुसार जिल्ह्यातील व्यक्तीसंस्थांनी विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत.

            अधिक माहितीसाठी सहायक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयडॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनसात रस्तासोलापूर किंवा दूरध्वनी क्र. ०२१७-२७३४९५० यावर संपर्क करण्याचे आवाहन श्री आढे यांनी केले आहे. अर्जाचा नमुना याच कार्यालयात उपलब्ध आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments