Hot Posts

6/recent/ticker-posts

स्मशानभूमीच्या समस्या सोडविण्यासाठी चक्क स्मशानभूमीतच आंदोलन

 स्मशानभूमीच्या समस्या सोडविण्यासाठी चक्क स्मशानभूमीतच आंदोलन

मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ शहरातील लिंगायत स्मशानभूमी मधील रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देऊनही अद्याप पर्यंत दखल घेतली नसल्याने लिंगायत स्मशानभूमीमध्येच दि.१३ मार्च रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोहोळ शहराध्यक्ष राहुल तावसकर यांनी दिली.
मोहोळ नगरपरिषद प्रशासन हे मोहोळ शहरातील सर्वात ढिम्म प्रशासन बनले आहे. कोणत्याही समस्या संदर्भात नागरिकांनी निवेदन दिले असता अधिकारी अत्यंत बेजबाबदारपणे त्याकडे डोळेझाक करतात. ठेकेदाराची पाठराखण करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला सर्वसामान्यांच्या समस्येबाबत काहीही देणे घेणे लागत नाही का असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते राहुल तावस्कर यांनी दैनिक कटूसत्यशी बोलताना व्यक्त केला.
याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे मी रीतसर पत्रव्यवहार केला होता याशिवाय या महत्त्वाच्या मागणी बाबत अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून ही विविध पदाधिकारी,अधिकारी यांना मागणी केली आहे. तरी देखील याकडे अत्यंत बेजबाबदारपणे सर्वांनीच डोळेझाक केल्यामुळे मला थेट स्मशानभूमीत जाऊनच आंदोलन करावे लागत आहे असेही तावसकर यावेळी म्हणाले.
मोहोळ शहरातील नरखेड रस्त्यावर असलेल्या लिंगायत स्मशानभूमी नगरपरिषदेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून अंतर्गत रस्ते करण्यात आले. मात्र ठेकेदाराने स्मशानभूमी मध्ये केलेले रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून शासनाच्या नागरिकांच्या सोयीसुविधा साठी वापरल्या जाणाऱ्या निधी मधून लाखो रुपये खर्चून शासनाच्या पैशाचा अपव्यय केला आहे. मोहोळ शहरातील या स्मशानभूमीतील रस्त्यांची तात्काळ चौकशी करून टेंडर प्रमाणे काम न करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी निवेदने दिली होती मात्र त्याची अद्यापपर्यंत दखल घेतली नसल्याने दि.१३ मार्च रोजी लिंगायत स्मशानभूमी मध्येच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती राहुल तावसकर यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments