लांबोटीच्या नूतन सरपंचांचा जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने सन्मान
कोंडी (कटुसत्य वृत्त ) :- जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल कोंडी या संस्थेचे सर्वेसर्वा गणेश नीळ यांच्यावतीने ग्रामपंचायत लांबोटीचे नूतन सरपंच लक्ष्मी चट्टे पाटील,उपसरपंच भारत होनमाने, पत्रकार ब्रम्हा चट्टे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. "सगळ्यांना सोबत घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही नूतन सरपंच लक्ष्मी चट्टे पाटील यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी अमर जाधव, सागर माने, वासुदेव चट्टे, गणेश जाधव, प्रवीण चट्टे, बंडू चट्टे, दादा माने आदी उपस्थित होते.
0 Comments