संभाजी ब्रिगेड माढा तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी

टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त ) :- माढा तालुका संभाजी ब्रिगेडच्या कार्यकारिणीची बैठक मोडनिंब ता.माढायेथे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा सचिव सुहास टोणपे,संभाजी ब्रिगेडचे नेते दिनेश जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व जिजाऊ वंदनेने बैठकीला सुरूवात करण्यात आली. बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या तालुका कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला व पुढील वाटचालीविषयी चर्चा करण्यात आली तसेच नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या तालुका संघटकपदी बाळासाहेब वागज, विद्यार्थी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी शंकर नागणे, कुर्दू जि.प.विभागप्रमुखपदी श्रीकांत गायकवाड, मानेगाव जि.प. विभागप्रमुखपदी अजिंक्य चव्हाण, पं.स.मोडनींब गटप्रमुखदी वैभव शिंदे, पं.स.टेंभुर्णी गटप्रमुखदी भारत जगताप, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी, टेंभुर्णी शहराध्यक्षपदी अजय गायकवाड यांची तसेच चित्रपट आघाडीच्या जिल्हा संघटकपदी संभाजी बारबोले यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, कार्याध्यक्ष सतीश चांदगुडे, उपाध्यक्ष प्रकाश नागटिळक, करमाळा संपर्कप्रमुख गणेश शिंदे, अरुण जगताप, परितेवाडी शाखाप्रमुख अंकुश जाधव, सिध्देश्वर सावंत, सचिन सावंत, परिते शाखाप्रमुख नानासाहेब कौलगे, ग्रा.प.सदस्य नवनाथ शिंदे ,धनंजय भोसले,सागर चव्हाण,अविनाश नांगरे उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांना निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा सचिव सुहास टोणपे, नेते दिनेश जगदाळे, तालुकाध्यक्ष बालाजी जगताप यांनी कार्यकारणीला व नुतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
0 Comments