कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना लवकर अमलात येणे गरजेचे : जलतज्ञ अनिल पाटील
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त) :- दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्याला जलसमृद्ध करण्यासाठी कृष्णा आणि भीमा या दोन नद्या व त्यांच्या उपनद्यासह जोडल्यास 103 टीएमसी पाणी उपलब्ध होते.पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना लवकर अमलात येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जलतज्ञ अनिल पाटील यांनी केले.
जागतिक जल दिनाचे औचित्य साधत पत्रकारांशी पाटील यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
भविष्यात भासणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्याची उपलब्धता वाढवणे आवश्यक असून यासाठी राज्य सरकारने २००४ मध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना मंजूर केली असून या योजनेची लवकर अंमलबजावणी करणे आवश्यक असून दक्षिण कोल्हापूर मध्ये पडणारे पावसाचे पाणी अडवता येत नाही म्हणून ते वाहून कर्नाटकात जाते कुंभी, कासारी, वारणा , कृष्णा-नीरा-भीमा या नद्या जोडणे व दुसरे म्हणजे १९१० ते १९३० या काळात ब्रिटिशांनी जो करार करून जे पाणी मुळशी भागातील सहा धरणे बांधून कोकणात सोडलेले ४७ टीएमसी पाणी बंद करून भीमा खोऱ्यात वळवले पाहिजे ते पाणी सोलापूरच्या टेल भागातील ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता व गरज आहे तेथे पोहचवणे आवश्यक आहे यासाठी ही योजना करण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची पाण्याची कमतरता पूर्ण होईल या साठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाण्याचा काटकसरीने वापर करणे व पाण्याचे प्रदूषण थांबवण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
0 Comments