भारत शिंदे यांचा पडसाळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
लऊळ (कटूसत्य वृत्त) :- जिल्हा परिषद सदस्य भारत शिदे यांची जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पडसाळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच बावी गावचे सुपुत्र विक्रम नागटिळक यांची आर्मी टेक्निशियनपदी भरती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गावचे ज्येष्ठ नेते पोलिस पाटील जालींदर मुटकुळे, माजी कृषी अधिकारी रामचंद्र मुटकुळे, प्रगतशील बागायतदार कुर्मदास पाटील, महाराष्ट्र राज्य समता परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दत्ता घाडगे, भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महावीर मुटकुळे, वसंत केदार, सचिन पाटील, महेश पाटील, प्रविण पाटील, संतोष पाटील, भरत पाटील, दतात्रय देशमुख, दादाराव देशमुख, प्रकाश पाटील, सूकमार मुटकुळे, सजंय मुटकुळे, मोहन मुटकुळे, धनंजय पाटील, बिभीषण मुटकुळे , गणेश मोरे, धनाजी पाटील, पिंटू मुटकुळे, जयहिंद मुटकुळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments