अनुश्री आणि ऐश्वर्या संपूर्ण भारतातून सीए च्या परीक्षेत 27 आणि 39 इतका रँकने उत्तीर्ण
पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षेत यशस्वी होणाऱ्या दोघी बहिणींचे सर्वत्र कौतुक होत आहे
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापुरातील सुप्रसिद्ध व्यापारी कमल कॉस्मेटिक्स मालक कमल किशोर सोनी हे त्यांचे वडील आहेत. आणि अनुज सोनी त्यांचें बंधु आहेत.
अनुश्री आणि ऐश्वर्या या नुकत्याच जानेवारी महिन्यात संपन्न झालेल्या सीए परीक्षेत 27 आणि 39 अशा रँक ने पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. अनुश्री या नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट च्या परीक्षेत फायनल एक्झाम मधे ऑल इंडिया रँक 27 ने उत्तीर्ण झाल्या आहेत. अनुश्री या कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करून त्या सी ए फायनल एक्झाम च्या तयारीला लागल्या . त्यांना पुणे येथील व्हीं. स्मार्ट इन्स्टिट्यूट , संजय सराफ इन्स्टिट्यूट या संस्थेचे मार्गदर्शन लाभले . आणि त्या यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्या. सायन्स बॅकग्राऊंड असूनही अगदी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच ऐश्वर्या कमल किशोर सोनी यादेखील सीए परीक्षेत 39 रँक मिळवून यशस्वीपणे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्या आयपीसीसी मध्ये देखील फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्लिअर झालेले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या सीए परीक्षत देखील पहिल्याच प्रयत्नात एकोणचाळीस इतके रँक मिळवून यशस्वी झालेले आहेत. एकाच कुटुंबतील या दोघी बहिणी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्यामुळे माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे. तसेच एकाच कुटुबतील दोन बहिणी यशस्वी झाल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.
0 Comments