विविध विकासकामांबाबत स्वाभिमानीची आ. संजयमामांबरोबर चर्चा; ठोस कार्यवाहिचे दिले आश्वासन
करमाळा (कटुसत्य वृत्त ) :- करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नांच्या बाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी दिली.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्याचे आ. संजय शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन करमाळा तालुक्यातील रावगाव गटांमधील शेतीपंपाची वीज कमी दाबाने मिळत आहे. रावगाव -शेळके वस्ती - दक्षिण वडगाव -हिवरवाडी - करमाळा रस्त्याची खूप बिकट अवस्था झालेली आहे .हा रस्ता रावगाव गटातील मुख्य रस्ता मानला जातो या रस्त्याची तात्काळ काम व्हावे व रावगाव मधील शेती पंपाची वीज पूर्ण दाबाने शेतकऱ्यांना मिळावी आणि करमाळा तालुक्यातील इतर विकासकामांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली व लवकरात लवकर कामे मार्गी लावू असे आ. शिंदे यांनी आश्वासन दिले. यावेळी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे,ता.युवा अध्यक्ष अमोल घुमरे,ता.पक्षाध्यक्ष बापू फरतडे,
ता.उपाध्यक्ष तानाजी शिंदे,स्वाभिमानी नेते दीपक शिंदे,बलभिम धगाटे,कांतीलाल शिंदेउपस्थित होते.
0 Comments