सोलापूर जिल्ह्यातील सर्व गडकिल्लायावर दुर्ग पुजा संपन्न
अकलूज (कटुसत्य वृत्त ) :- शिवाजी ट्रेल संस्थेचे वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व गडकिल्लयावर दुर्ग पुजा संपन्न झाली महाराष्ट्र सह भारतातील 142 किल्ल्यावर फेब्रुवारी महीन्याचे शेवटचे रविवारी हा दुर्ग पुजनाचा कार्यक्रम एकाच वेळी घेतला जातो व दुर्ग संवर्धनास सुरवात केली जाते गेली 24 वर्षापासून हा उपक्रम शिवाजी ट्रेल चे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली हा उपक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने चालु आहे या उपक्रमाची लिम्बका बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये ही नोंद झाली आहे दुर्ग संवर्धन समिती सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील व सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली अकलुज, सोलापूर, मंगळवेढा, करमाळा, मोहोळ,सांगोला या ठिकाणी दुर्ग पुजन करणेत आले प्रथम गडकिल्लयाची साफसफाई करून गडावरील मंदिरातील देवीचे पुजन करणेत आले सदर कामी,अभिराज शिंदे, निखिल सावंत,नाना साळुंखे सोलापूर, असगर पठाण, सांगोला, आजीनाथ जाधव करमाळा, कांतीलाल राऊत, राहुल माने,मयुर माने ,सतिशनाना पालकर ,जोतीताई कुंभार दीपक सुत्रावे, राजाभाऊ गुळवे, रणजीतसिंह देशमुख, नवनाथ भाऊ साठे, महेश शिंदे, इन्नुस शेख,शहाजी आघाडे ,निलेश लोहार यांचे सह अनेक दुर्ग संवर्धन समिती सोलापूर जिल्हा सदस्यानी सहभाग घेतला
0 Comments