जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील तक्रारीचा आढावा घेण्यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयात सभेचे आयोजन
पुणे (कटुसत्य वृत्त ) :- पुणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील तक्रारींचा आढावा व तक्रारदारांना समक्ष निवेदन मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 2 मार्च 2021 रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत सभा आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील 31 मार्च 2020 पुर्वी सादर केलेल्या तक्रारी संदर्भात तक्रारदारांनी आपले निवदेन मांडण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह समक्ष उपस्थित राहण्याचे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. बोटे यांनी केले आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अभियान कालावधीत झालेल्या मृद व जलसंधारण कामांची खुली चौकशी करण्यासाठी शासनाने दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली खुली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
0 Comments