Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार सपाटे यांना प्रदान

 मराठा महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार सपाटे यांना प्रदान

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- आखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर शहर-जिल्हा यांच्या तर्फे संघटनेचे संस्थापक माजी आ. कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या नावाने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार येथील माजी महापौर सपाटे यांना प्रदान करण्यात आला.
         छत्रपती शिवाजी प्रशालेत अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आ. नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सपाटे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सपाटे यांनी आपल्या भाषणातून अण्णासाहेबांचा तेजस्वी जीवनपट उलगडून दाखविला. तर माजी आ. पाटील यांनी सपाटे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कामाची तोंडभरून कौतूक केले.
         या कार्यक्रमास माजी उपमहापौर नाना काळे, सकल मराठा समन्वयक माऊली पवार, नगरसेवक विनोद भोसले, अजिंक्यराणा पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, नागेश मोरे, द्वारकेश सावंत, लहू गायकवाड, श्रीकांत घाडगे, चंद्रकांत पवार, राजन जाधव, दत्ता भोसले, किरण शंकर पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments