अकलूज येथे बंदला उत्कृष्ट प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

अकलूज येथे बंदला उत्कृष्ट प्रतिसाद

 अकलूज येथे बंदला उत्कृष्ट प्रतिसाद 

अकलूज (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नुकताच प्रतिबंधक उपाययोजना करणे बाबतचा आदेश  शासनाकडून झालेला आहे.या पार्श्वभूमीवर अकलूज येथे बंदला नागरिकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
          गेली वर्षभर कोरोना सारख्या महाभयानक अशा विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचे संकट शमले असे वाटत होते. परंतु नवे रौद्र रुप धारण करून कोरोणाने पुन्हा एकदा आगमन केले असून  
          सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1997 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली आहे. सोलापूर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास प्रतिबंध करणेसाठी खालील प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 07.00 वा ते रात्री 07.00 वा या कालावधीत चालू राहतील. तथापि हे निर्बंध आवश्यक सेवा/मनुष्य व प्राणी मात्रा साठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्रे वितरण या बाबींना लागू राहणार नाही.
        प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि हे निर्बंध अत्यावश्यक सेवा/ मनुष्य व प्राणी मात्र साठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्रे वितरण या बाबींना लागू राहणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार, जनावरांचा बाजार बंद करण्यात येत आहे. खाद्यगृह, परमिट रूम, बार फक्त सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत covid-19 चे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून 50% क्षमतेने सुरू राहतील. होम डिलिव्हरीचे किचन /वितरण कक्ष रात्री 10.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जीम, व्यायाम शाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील. अन्यथा इतर करण्यासाठी उपरोक्त सेवा बंद राहतील. तसेच स्पर्धा/कार्यक्रम बंद राहील. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 07.00 ते संध्याकाळी 07.00  या वेळेत सुरु राहतील. धार्मिक विधींमध्ये 05 व्यक्तींपेक्षा जास्त उपस्थिती राहणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने नियोजन करून एका दिवशी व एकाच वेळी लिलाव न करता मालाच्या प्रकारानुसार लिलावाचे दिवस व वेळा विभागून द्यावेत व त्याचे नियोजन संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर यांनी करावे.
            तसेच बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालाची त्या ठिकाणी किरकोळ विक्री करण्यास प्रतिबंध असेल.
 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये (कंटेनमेंट झोन) सर्व प्रकारची दुकाने, अस्थापना, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, कार्यालय बंद ठेवण्यात यावीत, तथापि या ठिकाणी अत्यावश्यक सेवेची अस्थापना विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार चालू ठेवण्यात यावीत. सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरू करून जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये covid-19 बाबतचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बाबत जनजागृती करावी. तसेच covid-19 बाबतीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे सुरक्षित अंतर राखणे ह्यांचा आणि  टायगरचा वापर इत्यादी बंधनकारक राहील.
          शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अस्थापना तसेच सर्व नागरिकांनी उपरोक्त नमूद केलेल्या सर्व उपाययोजना त्याचप्रमाणे शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी.
आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्यावर भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे आणि विनियम या नुसार कारवाई करण्यात येईल. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages