ऐन उन्हाळ्यात प्रभाग 8 मध्ये सुरवसे परिवाराचा आदर्श उपक्रम
पिण्याच्या पाण्यासाठी साठेनगर येथे संतोष सुरवसे यांनी केली बोअरची सोय
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ शहरातील प्रभाग क्र.८ मधील आण्णाभाऊ साठेनगर येथे होणारी पिण्याची पाणी टंचाई पाहता राष्ट्रवादीचे युवा नेते संतोष सुरवसे व प्रथम महिला नगराध्यक्षा सरिता सुरवसे यांच्या वतीने बोअर मारून प्रभागातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यात आली आहे. उन्हाळ्यात सुरवसे परिवाराने हा अत्यंत आदर्शवत उपक्रम राबवून संपूर्ण शहराला समाजसेवेचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , मोहोळ शहरातील काही भागात उन्हाळ्याच्या पाश्वभूमीवर जाणवत आहे. प्रभाग क्र. ८ मधील साठेनगर भागात होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन युवा नेते संतोष सुरवसे यांनी या ठिकाणी बोअर पाडून येथील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला. आणि तब्बल तीनशे फूट बोर घेऊन पाण्याच्या सुविधेसाठी सुरवसे यांनी प्रयत्न केला. तर आनंदाची बाब म्हणजे या बोअरला अतिशय चांगले पाणी लागले आहे. यामुळे सुरवसे यांचे या उपक्रमाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी बोअर मशीनची नारळ फोडून पूजा करून या उपक्रमाचा शुभारंभ युवा नेते संतोष सुरवसे, सचिन कारंडे, जयवंत गुडं, संजय कारंडे, शंकर वसेकर, जनार्दन चौधरी, रशीद शेख, रमजान तांबोळी, सिताफ सर, अरबाज पठाण, जिलानी तांबोळी, सिद्धार्थ कुकडे, सुदर्शन गायकवाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन मोहोळ शहराच्या विकासावर आमच्या परिवाराने भर दिला आहे. आजवरच्या प्रभागाच्या विकासात्मक वाटचालीमध्ये नगरविकास प्रशासन , मोहोळचे मुख्याधिकारी एन के पाटील तसेच मोहोळ नगर परिषदेतील सर्व विभागाचे अभियंता व व इतर वरिष्ठ कर्मचारी बांधवांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे . मागील चार वर्षांपासून मी वार्ड ८ मधील सर्व भागात नागरी सुविधा देणेसाठी प्रयत्नशील असून त्यापैकी बरीच कामे मार्गी लावली आहेत.यामध्ये प्रामुख्याने सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पाईपलाईन करणे, पथदिवे बसविणे तसेच घरकुल योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थीना मिळवून देणे ही कामे केली असून येणाऱ्या वार्डाच्या विकासासाठी काम करत राहणार आहे . शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी मी यापुढेही वचनबदध राहणार आहे.
0 Comments