भाजपचे युवा नेते तथा ज्योती क्रांती परिषदेचे तालुकाध्यक्ष बलभीम भानवसे आणि कार्याध्यक्ष संतोष भानवसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

भाजपचे युवा नेते तथा ज्योती क्रांती परिषदेचे तालुकाध्यक्ष बलभीम भानवसे आणि कार्याध्यक्ष संतोष भानवसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे युवा नेते तथा ज्योती क्रांती परिषदेचे तालुकाध्यक्ष बलभीम भानवसे आणि कार्याध्यक्ष संतोष भानवसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अनगर येथे जेष्ठ नेते राजन पाटील,अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

मोहोळ (कटूसत्य वृत्त ) :- ज्योती क्रांती कांती परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा भाजपाचे सौंदणेचे युवा नेते बलभीम भानवसे आणि ज्योती क्रांती परिषदेचे कार्याध्यक्ष संतोष भानवसे यांनी माजी आ. राजन पाटील व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
         दि. २२ मार्च रोजी तालुक्याची राजकीय राजधानी ठरलेल्या अनगर ग्रामसचिवालयामध्ये रोजी सौंदणे (ता. मोहोळ) येथील यापुर्वी भाजपमध्ये सक्रीय असलेले आणि  ज्योती क्रांती परिषदेचे तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेले सौंदणे येथील युवा नेते बलभीम भानवसे आणि कार्याध्यक्ष संतोष भानवसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ तालुक्याचे सर्वेसर्वा आणि विकास मार्गदर्शक माजी आ. राजन पाटील व पंचायत समिती सदस्य तथा मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. मोहोळ तालुका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राजन पाटील यांनी यावेळी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करून सन्मान केला. गत आठवडाभरापूर्वीच बलभीम भानवसे यांनी  अनगर येथे लोकनेते शुगरवर जाऊन बाळराजे पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सौंदणे येथील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भानवसे यांनी अनगर मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे सौंदणे परिसरात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढली आहे.
         यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा सौंदणेचे विकास मार्गदर्शक भारत सुतकर, सौंदणेचे उपसरपंच सचिन भानवसे, सौंदणेचे राष्ट्रवादी संघटक वसंत माळी, सोसायटीचे माजी चेअरमन विकास माने, शकील पठाण, दत्तात्रय गोडसे, उद्योजक संतोष गोडसे, पांडुरंग भानवसे, उमाजी पाटील, दिगंबर बनसोडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
     मोहोळ तालुक्याच्या विकासात लोकनेते परिवाराचे मोलाचे योगदान असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून यापुढे राजकारणात कार्यरत राहून माजी आ. राजन पाटील, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, पं. स. सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली  काम करणार आहे. मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माजी आ. राजन पाटील हे खऱ्या अर्थाने अत्यंत कौशल्याने पार पाडत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. ही महत्वाची बाब मनाला पटल्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढील काळात सौंदणेसह पंचक्रोशीत राष्ट्रवादीची युवा फळी आणखी मजबूत करण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages