Hot Posts

6/recent/ticker-posts

बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीत जोरदार हालचाली

बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीत जोरदार हालचाली
राष्ट्रवादीकडून केली लखनभाऊ कोळी यांनी उमेदवारीची मागणी
मोठा जनसंपर्क असलेल्या कोळी यांची उमेदवारी राष्ट्रवादीसाठी जमेची बाब

                                      


मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीची पूर्वतयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या जोमात सुरू झाली आहे. मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवा नेते सामाजिक कार्यकर्ते लखन कोळी यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्याकडे कोळी यांनी आपल्या समर्थकांसह जाऊन परिसर प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
                गेल्या अनेक महिन्यापासून प्रभाग 14 मधून अनेक दिग्गजांची जरी नावे चर्चेत असली तरी सध्या सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती लखन कोळी यांचीच.संघटित युवकांची मोठी फळी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी करण्यामध्ये लखन कोळी यांचे योगदान मोठे आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या सामाजिक उपक्रमाच्या उदघाटनासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मोहोळ तालुक्याचे सर्वेसर्वा माजी आ. राजन पाटील प्रभाग क्रमांक 14 मध्ये येतातच. कोळी यांनी प्रभागाची राष्ट्रवादीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही.शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शहाजान मालक शेख, युवानेते बाळराजे पाटील ,अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लखन कोळी यांनी प्रभागात एक समाजाभिमुख युवा नेतृत्व अशी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे एक स्थानिक आणि अभ्यासू उमेदवार म्हणून कोळी यांनाच पक्षाकडून संधी मिळावी अशी प्रभागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आणि प्रभागातील सर्व स्तरातील नागरिकांच्या आग्रहाखातर लखन कोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
               गेल्या काही महिन्यापासून या प्रभागातून स्थानिक उमेदवाराला संधी मिळावी असा सर्वपक्षीय रेटा वाढत आहे. वास्तविक पाहता हा प्रभाग खुला झाल्यामुळे शहराच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक झाले आहेत. त्यामुळे स्थानिक उमेदवारांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. लखन भाऊ कोळी हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकीय पदार्पणापूर्वी त्यांनी या प्रभागात सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे. सर्व  जयंती उत्सव असो अथवा रक्तदान शिबिर, वृक्षारोपण शिबिर, शालेय साहित्याचे वाटप यांचे यशस्वीपणे आयोजन करून प्रभागांमध्ये उपक्रमशील व्यक्तिमत्व अशी ओळख निर्माण केली आहे.
              आरक्षण सोडत होण्याच्या पूर्वीपासूनच लखन कोळी हे प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र कोळी यांनी कधीही याबाबत प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली नाही. इलेक्टिव्ह मेरीट असलेला एक आश्वासक चेहरा म्हणून कोळी यांना ओळखले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठा जनसंपर्क असलेले कोळी हे प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीच्या विजयासाठी जमेची बाब ठरू शकतात. त्यामुळे कोळी यांना उमेदवारी देण्याबाबत शहरातील पक्षश्रेष्ठी प्रमुख पक्ष नेत्यांना त्यांच्या इलेक्टिव्ह मेरिट बाबत सुचवू शकतात. त्यामुळे किती जरी दिग्गज या प्रभागातून इच्छुक असले तरी लखन कोळी यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी सकारात्मक निर्णय घेऊ शकते.



Reactions

Post a Comment

0 Comments