Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग 12 मध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस सर्वच पक्षांना बंडखोरीची धास्ती

 प्रभाग 12 मध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस
सर्वच पक्षांना बंडखोरीची धास्ती
राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला प्रभाग पुन्हा घेण्यासाठी शिवसेनेत हालचा

मोहोळ (कटुसत्य वृत्त ) :- सध्या मोहोळ नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष प्रमोद डोके प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रभाग 12 मध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी विकास कामे केली असली तरी या प्रभागात या निवडणुकीत ही मोठी चुरस जाणवणार आहे. गतवेळी शिवसेनेमधील समन्वय नसल्याचा फटका शिवसेना उमेदवाराला बसून शिवसेनेचा याठिकाणी पराभव झाला. पराभवाचा धक्का केवळ शिवसेनेलाच न बसता भाजपला देखील मोठ्या प्रमाणात बसला. या ठिकाणी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सतीश काळे यांचा दारुण पराभव राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद डोके यांनी केला. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून विजयी झालेल्या प्रमोद डोके यांनी प्रभागात विकासकामांचा धडाका सुरू केला. अनेक ठिकाणी कॉंक्रिटीकरण केले पाण्याचा प्रश्न सोडविला.  सध्या हा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने प्रमोद डोके यांना पर्यायी प्रभाग शोधावा लागला आहे.सध्याचे प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याचे समजते. मात्र तरीही प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रमोद डोके हे त्यांच्या विचाराच्या उमेदवाराला उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. मात्र या प्रभागातून राष्ट्रवादीकडून अनेक दिग्गज इच्छुक असल्याचे समजते. मात्र पक्षश्रेष्ठी प्रमोद डोके यांनी या भागात विकास कामे करून मोठा जनसंपर्क वाढवल्याने राष्ट्रवादीचा जनाधार वाढला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांना विश्‍वासात घेऊनच उमेदवारी जाहीर करणार यात तिळमात्र शंका नाही. 
जरी राष्ट्रवादीकडून अनेकांची नावे चर्चेत असली तरी सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला या प्रभागातील विजय मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण बारा आणि चौदा या गेल्या वेळी निसटलेल्या जागा पुन्हा जिंकण्यासाठी ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांनी मोठी व्युव्हरचना लावल्याचे समजते. सध्या प्रभाग क्रमांक पंधराच्या नगरसेविका असलेल्या सीमा पाटील या येत्या निवडणुकीच्या निकालानंतर नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत उतरू शकतात. मात्र जर या स्वतः रहात असलेल्या प्रभाग 12 मध्ये शिवसेनेचा पुन्हा पराभव झाला तर सीमा पाटील यांना मोठा धक्का मानला जाऊ शकतो. त्यामुळे काहीही झाले तरी या प्रभागात पुन्हा शिवसेनेचा विजय होण्यासाठी सीमा पाटील यांनी देखील मोठी रणनीती आखल्याचे समजते. मात्र शिवसेना या ठिकाणी कोणाला उमेदवारी देणार याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. अनेक स्थानिक कार्यकर्ते आम्हाला उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करत आहेत. मात्र जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी प्रभागातील स्थानिक शिवसैनिकांना विश्वासात घेऊनच वरिष्ठांना आपण इच्छुकांची नावे पाठवणार असल्याचे सांगितल्यामुळे या वेळी नक्कीच या ठिकाणी स्वच्छ आणि चांगल्या प्रतिमेचा उमेदवारी मिळणार यात तिळमात्र शंका नाही.

प्रभाग क्रमांक 11 12 13 14 15 या प्रभागावर जितके लक्ष राष्ट्रवादीचे नाही तितके लक्ष शिवसेनेचे आहे. गत निवडणुकीमध्ये अत्यंत अनपेक्षितपणे प्रभाग क्रमांक 12 आणि 14 मध्ये शिवसेनेला पराभव पत्करावा लागला. याचा परिणाम सत्ता स्थापनेच्या वेळी होऊन पाच वर्ष विरोधी पक्षात शिवसेनेला बसावे लागले. जरी मतविभागणीचा तोटा शिवसेनेला झाला तरी भाजपला देखील काहीही फायदा झाला नाही. राष्ट्रवादीला मात्र याचा मोठा फायदा झाला. या दोन जागा जर शिवसेनेने जिंकल्या असत्या तर सध्याच्या राष्ट्रवादीच्या सत्तेच्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला असता. मात्र गतवेळी निवडणुकीमध्ये शिवसेनेत शुन्य समन्वय सर्वांनाच जाणवला. शिवसेनेला सत्ता मिळण्यापेक्षा भाजपने शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी धडपड केली. आतादेखील शिवसेनेला तिसऱ्या आघाडीच्या मतविभागणीचा फटका बसू शकतो. त्यामुळे शिवसेनेला अशा मोक्याच्या प्रभागांमध्ये चांगले उमेदवार देणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments