Hot Posts

6/recent/ticker-posts

मनोज शेजवाळ यांची सोलापूर महापालिका स्थायी वर झालेली निवड बेकायदेशीरच . नागेश वनकळसे , आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आमच सर्वस्व.

 मनोज शेजवाळ यांची सोलापूर महापालिका स्थायी वर झालेली निवड बेकायदेशीरच  , नागेश  वनकळसे , आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आमच सर्वस्व.       

           

मोहोळ (कटुसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती निवडी मध्ये जो गोंधळ झालेला आहे तो पक्षात चुकीचा संदेश देणारा आहे. कारण नगरसेवक मनोज शेजवाळ यांची पक्षातून हाकालपट्टी झालेली आहे. त्यांच्या हाकालपट्टीचे आदेश सामनातून तर छापून आलेच आहेत परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोहोळ मध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ आल्यानंतर मा. उद्धव साहेबांनी नगरसेवक मनोज शेजवाळ यांची हाकालपट्टी जाहीर केली होती असे असताना त्यांची निवड ही पक्षप्रमुखांच्या परस्पर केलेली दुर्दैवी घटना आहे याचा पक्षाशी कोणताही संबध नाही, उलटपक्षी ही बाब  पक्ष शिस्तीवर परिणाम करणारी आहे असे मत शिवसेनेचे युवा नेते नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.                         
             याबाबत सविस्तर बोलताना नागेश वनकळसे म्हणाले की शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे, एकदा आदेश निघाला की तो वचनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि पक्षाचा  पहिला आदेश हा मनोज शेजवाळ यांची हाकालपट्टी असा  होता तर दुसरा आदेश असा की, सोलापूर स्थायी समिती सदस्य नेमणूकीबाबत  शिवसेनेतर्फे ज्या तीन सदस्यांची शिफ़ारस केली होती त्यामध्ये जिल्हाप्रमुख गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले आणि लक्ष्मण जाधव ही तीन नावे पक्षाने दिली होती, मा सचिव अनिल देसाई साहेबांनी दिली होती.                     शिवसेनेने  मनोज शेजवाळ यांची हकालपट्टी केलेली आहे, शिवसेनेत आदरणीय उद्धव साहेब हेच दैवत आहेत आणि अंतिम आहेत त्यांनी हाकालपट्टी केलेल्या माणसाला पक्षात घेण्याचा अधिकार फक्त आदरणीय उद्धव साहेबांनाच आहे. असे मत नागेश वनकळसे यांनी व्यक्त केले.  
              गत विधानसभेवेळी शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात शेवटपर्यंत नकारात्मकता मनोज शेजवाळ यांनी तयार केली, तसेच शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले,अपक्ष उभे राहून बंडखोरी केली स्वतःला दोन हजार आठशे मते पडली हे वास्तव आहे. आपण  कमी पडतो आहोत म्हटल्यावर शेवटी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली, त्यांचा विजय कसा सोपा होईल याला साथ दिली आणि  वातावरण चांगले असताना मोहोळ ची जागा गेली,अशी खंत श्री वनकळसे यांनी व्यक्त केली.                 
सध्या मोहोळ मधील प्रत्येक शिवसैनिक गतवेळी नगरपरिषदेत झालेल्या निसटत्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज आहे. शिवसेनेची ताकतीने व्युव्ह रचना चालू आहे त्यातही मनोज शेजवाळ हे ढवळा ढवळ करून  बंडखोराना खतपाणी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि गेल्यावेळी प्रमाणे राष्ट्रवादी ला मतविभागणीचा फायदा करून देण्यासाठीच शेजवाळ यांचा वावर मोहोळ येथे वाढला आहे. म्हणून  त्याबाबतची कठोर उपाययोजना करण्याची मागणी आम्ही सर्व शिवसैनिक पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्याकडे करणार आहोत असे नागेश वनकळसे म्हणाले.
                यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले आदी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments