चव्हाणवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सुनील मिस्कीन तर उपसरपंचपदी सौ साळुबाई मोटे
टेंभुर्णी ( कटूसत्य वृत्त ) :- टेंभुर्णी पासून जवळच असलेली चव्हाणवाडी टे ग्रामपंचायत ची सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या सरपंच पदासाठी सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये नामनिर्देशन सादर करण्याची होते. यावेळी सरपंच पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण असल्याने संयुक्त ग्राम विकास आघाडीतर्फे श्री सुनिल विश्वनाथ मिस्कीन यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले तर उपसरपंच पदासाठी सौ.साळूबाई बाळासाहेब मोटे यांचा एकमेव नाव नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.
दुपारी बारा वाजेपर्यंत सरपंच व उपसरपंच पदासाठी संयुक्त ग्राम विकास आघाडी मधून हे दोनच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने सदर उमेदवार बिनविरोध झाली असल्याचे निवडणूक अधिकारी व चव्हाणवाडी चे ग्रामसेवक साळुंके यांनी जाहीर केले.
सदर निवडीवेळी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य नवनाथ शिंदे, सिंधुताई सलगर उपस्थित होत्या. निवडीवेळी पार्टी प्रमुख चेअरमन अशोक बापू मिस्कीन तसेच चव्हाणवाडी तंटामुक्त अध्यक्ष व कै. रघुनाथ आबा चव्हाण पार्टीचे प्रमुख अरुण बापू चव्हाण, नागनाथ आप्पा चव्हाण, कैलास चव्हाण हे आवर्जून उपस्थित होते. निवड घोषित होताच संयुक्त ग्राम विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी चव्हाणवाडी चे माजी सरपंच हनुमंतआण्णा चव्हाण माजी सरपंच प्रतिनिधी संतोष आप्पा जाधव, अर्जुन सलगर,माजी सरपंच भागवत खडके, चव्हाणवाडी विकासासाठीचे माजी चेअरमन नरहरी नांगरे, विकास सेवा सोसायटी चे माजी संचालक महावीर नांगरे, नांगरे वस्तीवर चे ज्येष्ठ नेते सौदागर नांगरे ,चांगदेव चव्हाण अँड व्हकेट सचिन चव्हाण, नांगरे ग्रुपचे किंगमेकर रमेश नांगरे ,संजय मिस्कीन , विठ्ठल तात्या चव्हाण, अनिल चव्हाण, टेंभुर्णी शिवशंकर हॉटेल चे मालक बाळासाहेब चव्हाण, लक्ष्मण मोटे, मारुती शिंदे ,सुनील भोसले , बाळासाहेब मोटे, नवनाथ नांगरे सर , चव्हाणवाडी माजी सरपंच प्रतिनिधी साहेब लाल नाना काजी, ईश्वर तळेकर, नामदेव चव्हाण, मनोज कुमार नांगरे सर, श्याम नांगरे, समाधान नांगरे ,मारुती मिस्किन, अंकुश सलगर, लहू जाधव, आबा मिस्कीन, विजय कदम, अतुल भोसले, भारत जगताप, भाऊ इंदलकर ,उपस्थित होते.
श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सरपंच उपसरपंच व विद्यमान सदस्यांचे सत्कार करण्यात आले.
या निवडीनंतर प्राध्यापक मनोज नांगरे सर, संजय मिस्कीन हनुमंत चव्हाण व नूतन ग्रामपंचायत सदस्य स्मिता मनोज नांगरे, यांनी आपली मनोगते व्यक्त केली कै. रघुनाथ आबा चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments