Hot Posts

6/recent/ticker-posts

लऊळ ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा महिलाराज,१७ पैकी ११ जागांवर महिला सदस्य सरपंचपदी पूजा बोडके तर उपसरपंचपदी संजय लोकरे बिनविरोध

 लऊळ ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा महिलाराज,१७ पैकी ११ जागांवर महिला सदस्य
सरपंचपदी पूजा बोडके तर उपसरपंचपदी संजय लोकरे बिनविरोध

लऊळ  ( कटूसत्य वृत्त ) :-  संपूर्ण माढा तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या लऊळ ता.माढा येथे 
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दरलिंग ग्रामविकास आघाडीच्या पूजा प्रशांत बोडके तर उपसरपंचपदी संजय 
सुधाकर लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच व उपसरपंच या पदासाठी फक्त दोनच अर्ज 
आल्याने ही निवड बिनविरोध ठरली.गतवर्षीच्या निवडणूकित स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीला निसटता
 विजय मिळवता आला होता.सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने प्रियंका दिनेश कांबळे
 यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली.मात्र यावेळी दरलिंग ग्रामविकास आघाडीने जोरदार मुसंडी 
मारत १७ पैकी १० जागांवर आपला विजय मिळवत आपली सत्ता स्थापन केली.
सरपंच निवडीची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने गावचा सरपंच कोण होणार याची सर्वत्र  चर्चा होती.मात्र २३
फेब्रुवारीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड झाली व अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळत पूजा प्रशांत 
बोडके या नूतन सरपंच पदी बिनविरोध विराजमान झाल्या.लऊळ ग्रामपंचायत सरपंचपद भुषवणाऱ्या त्या 
चौथ्या महिला आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य महेश बागल,यशश्री गांधले,कल्याण गाडे,सत्यभामा लोकरे,मनीषा गवळी, 
दिपाली मांदे,आश्विनी भोंग,पवन भोंग,सावित्रीबाई गणगे,रुपाली जानराव,खंडू भोंग,प्रियंका कांबळे,नामदेव 
भोंग,निर्मला नलवडे,शांताबाई घुगे आदी उपस्थित होते.निवडीनंतर दरलिंग ग्रामविकास आघाडीच्या वतीने
 गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी दरलिंग ग्रामविकास आघाडीचे प्रमुख माढा तालुक्याचे माजी 
उपसभापती प्रतापराव नलवडे यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले.
Attachments area
Reactions

Post a Comment

0 Comments