Ads

Ads Area

धैर्या क्लिनिकच्या माध्यमातून सर्वसामान्यांची रुग्णांची सेवा खवळे परिवाराने करावी - माजी आमदार राजन पाटील यांचे प्रतिपादन

धैर्या क्लिनिकच्या माध्यमातून सर्वसामान्यांची रुग्णांची सेवा खवळे परिवाराने करावी - माजी आमदार राजन पाटील यांचे प्रतिपादन

लोकशाहीर आण्णाभाऊ साठेनगर मध्ये धैर्या क्लिनिकचे उदघाटन

          मोहोळ (कटुसत्य वृत्त): काळाच्या बदलत्या ओघात प्रत्येकाला आपल्या शरीराचे रक्षण करावेच लागणार आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा-सुविधा वेळेवर आणि त्वरित मिळणे अत्यंत गरजेची बाब बनली आहे. सर्व सेवेमध्ये वैद्यकीय सेवा ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र सुरुवातीपासूनच मानली गेली आहे. मोहोळ शहरांमध्ये जास्तीत जास्त वैद्यकीय सेवा देऊ शकणारे छोट्या-मोठ्या दवाखान्यांची आणि सुसज्ज हॉस्पिटलची गरज आहे. करोना सारख्या महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्र किती अत्यावश्यक बाब आहे हे सर्वांनाच जाणवले आहे. अदयावत वैद्यकीय सेवेची गरज लक्षात घेऊन मोहोळ शहराच्या पूर्व भागातील रुग्णांची सेवा करण्यासाठी मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक सहाचे राष्ट्रवादी नगरसेवक दत्तात्रय खवळे यांच्या सुविद्य पत्नी डॉ. आराधना खवळे -टिळेकर यांनी धैर्या क्लीनिकच्या माध्यमातुन वैद्यकीय सेवा देणारा दवाखाना सुरू केला आहे. या त्यामुळे या परिसरातील गरजू रुग्णांना वेळेवर चांगले उपचार मिळू शकतील असे प्रतिपादन मोहोळचे माजी आमदार तथा मोहोळ नगर परिषदेचे विकास मार्गदर्शक राजन पाटील - अनगरकर यांनी व्यक्त केले.

          मोहोळ शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे नगरसेवक दत्त्तात्रय खवळे यांच्या सुविद्य पत्नी डॉ आराधना खवळे - टिळेकर यांच्या धैर्या क्लिनिकचे उदघाटन माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजन पाटील बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी व्यासपीठावर आमदार यशवंत तात्या माने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शहजहान( मालक) शेख, डॉ. कौशिक तात्या  गायकवाड, प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, प्रभाग क्रमांक सहाचे दक्ष नगरसेवक दत्तात्रय खवळे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, माजी नगरसेवक मुस्ताक शेख, डॉ. वसीम शेख, नगरसेवक संतोष खंदारे, युवानेते संतोष सुरवसे, युवानेते अण्णा फडतरे,  माजी नगरसेवक कुंदन धोत्रे, शहाजान मगन शेख नागनाथ सोनवणे, युवराज सकट, युवराज मोरे, फकीरा जाधव, मिलिंद आष्टूळ, संतोष कमाईटकर, सोमनाथ रणदिवे, रोहिदास देशमुख, महादेव खवळे इत्यादी उपस्थित होते.

          यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत या कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक दत्तात्रय खवळे आणि डॉ. अराधना खवळे - टिळेकर यांनी केले. सर्वांचा यथोचित सन्मान करून आभार प्रभाग क्रमांक सहाचे राष्ट्रवादीचे दक्ष नगरसेवक दत्तात्रय खवळे यांनी व्यक्त केले

          हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश कांबळे, भाऊ अष्टूळ, गणेश माळी, बाळू माळी, सचिन रणदिवे, महादेव गायकवाड, सचिन घाडगे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close