Hot Posts

6/recent/ticker-posts

विहीरीत पडल्याने अरण येथे काळविटाचा मृत्यू

विहीरीत पडल्याने अरण येथे काळविटाचा मृत्यू 

          मोडनिंब, (प्रकाश सुरवसे) : विहीरीत पडल्याने अरण येथे तीन वर्ष वयाच्या काळविटाचा मृत्यू झाला. ही घटना अरण-भेंड रस्त्यावर असणाऱ्या बंधाऱ्याच्या नजीक घडली. बंधारा नजीक दत्‍तात्रय सोपान वसेकर यांची विहीर आहे. या विहिरीला सर्व बाजूने सिमेंट काँक्रेट भिंतीचे  संरक्षण आहे तरीदेखील या विहिरीत काळवीट पडले व त्याचा मृत्यू झाला. आज सोमवार दिनांक ४ रोजी सकाळी शेतमालक दत्तात्रय वसेकर हे विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यांना  विहिरीतील पाण्यावर काळवीट तरंगत असलेले दिसले ते मृत्युमुखी पडले होते.

          ही घटना कळताच वनमजूर शिवाजी दत्तू दळवी, तानाजी दळवी, अशोक यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत काळवीट ला विहिरीतून बाहेर काढले. अत्यंत दुर्गंधी येत असल्याने या काळविटावर विहिरी नजीकच अंत्यसंस्कार करण्यात आले.

          वनरक्षक सुरेश कुरले यांनी वन विभागा मार्फत पशुवैद्यकीय अधिकारी संजय शेंडगे  यांना पंचनामा करण्यासंदर्भात पत्र दिले व मृत काळविटाचा पंचनामा करण्यात आला. काळविटांची टक्कर होऊन, कुत्र्याच्या हल्ल्यामुळे सैरभैर पळत सुटलेले काळवीट गेल्या दोन तीन दिवसापूर्वी अखेर विहिरीत पडले असावे व त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वनमजूर शिवाजी दळवी यांनी व्यक्त केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments