एक सच्चा ग्रामपरिवर्तक - अमोल पाटील

सांगोला (कटूसत्य. वृत्त.): महात्मा गांधींनी सांगितले होते की खेड्याकडे चला. देशाची प्रगती ग्रामीण भाग जागृत झाल्याशिवाय होणार नाही. गावाला समृद्ध करण्याची गरज आहे असे मत महात्मा गांधींनी मांडले होते. त्यांचा आदर्श घेऊन य.मंगेवाडी ता-सांगोला येथील युवक कार्य करीत आहे, त्या ध्येयवेढ्या तरुणांचे नाव अमोल पाटील होय. महाष्ट्रातील अनेक गावे विकसित झाली, त्यात राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा अशी महाराष्ट्रातील काही नावे घेता येतील. कुशल संघटक ,कर्तृत्ववान आणि निस्वार्थी नेतृत्व लाभल्याने हिवरेबाजार, पाटोदा, राळेगणसिद्धी जगभर प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारे सांगोला तालुक्यातील डाळिंबाचे कुलिफॉर्निया अशी ओळख असलेले यलमर मंंगेवाडी हे गाव देखील जगाच्या पाठीवर प्रसिद्ध होत आहे. येथील शेतकऱ्यांच्या कष्टाने आणि जिद्दीने माळरानावर नंदनवन फुलवले आहे. या यलमर मंगेवाडी गावाला देखील अमोल पाटील यांच्यासारखा एक कार्यकुशल, कर्तव्यनिष्ट, निस्वार्थी नेतृत्व लाभले आहे. त्यांनी गावाला विकासाची नवी दिशा दिली आहे.
गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून मनुष्य हीच जात असे सांगून गावाला समता, बंधुत्व, ऐक्य समाज निष्ठा या तत्त्वांचा प्रसार आणि प्रचार करून एक समृद्ध आदर्श सर्वांना सोबत घेऊन गरीब श्रीमंत ही दरी नष्ट करून गाव च्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेली वीस वर्षे गावातील कोणत्याही नागरिकाला काही समस्या आल्यास तत्काळ कसलाही विचार न करता धाऊन जातात. समाज सेवेचे मूर्तिमंत उदाहरण उदाहरण म्हणजे अमोल अशोक पाटील होय.
0 Comments