देशातील शेतकरी अक्रोशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी राजीनामा द्यावा - नितीन झिंजाडे

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): देशातील शेतकरी आक्रोशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी केली आहे.
याबाबत करमाळा तहसीलदार समीर माने यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीनामा मागणीचे पत्र पाठवण्यात आले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की,केंद्र सरकारने हल्लीच तीन कृषी विधेयकाचे अध्यदेश कोणत्याही चर्चेविना पारित केले आहेत.या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर दीर्घकालीन दुष्परिणाम होणार असून शेतकऱ्याच्या कणा असणाऱ्या बाजार समित्या नष्ट होणार आहेत.या कृषी विधेयकास पंजाबमधील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.त्या शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र सरकारने अमानुषपणे चिरडण्याचा घाट घातला आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे त्याचा अवमान व अपमान केंद्र सरकारकडून होत आहे.
0 Comments