सांगोला नगरपरिषद, राजमाता प्रतिष्ठान व मायाक्का प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने

सांगोला शहरामध्ये स्वच्छता अभियान मोहीम संपन्न
सांगोला (कटूसत्य. वृत्त.): संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला वन अधिकारी नरेंद्र दोडके यांच्याहस्ते पुष्पहार घालून सांगोला शहरामध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात आरोग्य सभापती छायाताई मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली सांगोला नगरपरिषद, राजमाता प्रतिष्ठान(रजि.) व मायाक्का प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
या स्वच्छता अभियान मोहिमेमध्ये सांगोला न्यायालय परिसर, मुख्याधिकारी निवास परिसर, ईदगाह मैदान परिसर, क्रीडा संकुल परिसर याठिकाणी स्वच्छता करण्यात आली. शहराची स्वच्छता करण्याची एक चांगली मोहीम या सामाजिक संस्थांद्वारे सुरू करण्यात आली असून प्रत्येक रविवारी शहराच्या विविध भागांमध्ये याद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे. पुढील रविवारी प्रभाग क्र. 1 येथील चिंचोली रोड परिसर याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती या सामाजिक संस्थेकडून देण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्षा राणीताई माने, आरोग्य सभापती छायाताई मेटकरी, गटनेते आनंदा माने, नगरसेविका अप्सराताई ठोकळे, नगरसेवक अस्मिर तांबोळी, नगरसेवक माऊली तेली, सूर्यकांत मेटकरी, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे, सोमनाथ ठोकळे, राजमाता महिला पतसंस्थेच्या चेअरमन नसरीन तांबोळी, संचालिका सौ. प्रियांका श्रीराम, वन अधिकारी नरेंद्र दोडके, मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, हिफजुल तांबोळी, दीपक श्रीराम, आरिफ मुलाणी, देवा गावडे, सागर दिवटे, शेखर गडहिरे, दिलीप जानकर, राजमाता महिला पतसंस्थेच्या सेक्रेटरी मनीषा हुंडेकरी, पल्लवी कांबळे, रुकसाना मुजावर, ज्योती गडहिरे, सतीश रेवे, ज्ञानेश्वर गाडेकर, किसन खंडागळे, विशाल घुटूकडे, शरद गावडे, जय बनसोडे, रामा गाडेकर, प्रवीण जानकर, महेश कदम, संदीप हिंगमिरे, सोमनाथ पारसे, अनिल जानकर, अनिल वाघमोडे, निलेश लवटे, राजू उकिरडे, अब्बास पटेल, आशपाक मुलाणी, सुरज शिंदे, आसिफ मुजावर, नवनाथ जानकर, अण्णा साळुंखे, अमोल गावडे, सुनील पवार, दत्ता गोंजारी, चंदन मदने, रवी पवार, पृथ्वीराज बने, मनोज पवार, अमर बाबर, असीम इराणी, क्रीडा मार्गदर्शक अमोल इमडे, प्रशांत काशीद, सुभाष निंबाळकर, राहुल सुतार, लतीफ मुलाणी, लखन निंबाळकर, सुभाष निंबाळकर, आमिर मुलाणी, प्रवीण गावडे, तेजस करडे, सौरभ मेटकरी, अभिजित मदने, भारत माने यांच्यासह नगरपरिषदचे कर्मचारी मुकादम सोमनाथ बनसोडे, हणमंत लोखंडे, सुरज शेख, यांसह वृक्ष प्राधिकरणचे कर्मचारी प्रशांत पारसे, वैभव बदडे, विकास शेंबडे, भागवत राऊत आदी उपस्थित होते.
0 Comments