धवल "सिंहा"च्या हातून नरभक्षक "बिबट्या" चा अंत

अकलूज (कटूसत्य. वृत्त.): औरंगाबाद, जालना ,अहमदनगर, पाथर्डी, बीड, मनी डोंगर, आष्टी इत्यादी भागातून धुमाकूळ घालत आलेला नरभक्षक बिबट्याचा अंत अखेर अकलूजच्या धवलसिंहाने अत्यंत धाडसाने केला. डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील हे बारामतीचे हर्षवर्धन तावडे यांच्यासमवेत या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. त्यांच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
नरभक्षक बिबट्याने कित्येकांचा बळी घेतला होता.सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात त्याने दहशत निर्माण करून धुमाकूळ घातला होता तर तीन निष्पाप नागरिकांचे जीवनही संपवले होते.काळ बनून बिबट्याचा वावर वावरामध्ये वाढला होता. यामुळे शेतीचे कामे, दैनंदिन कामे हे चक्र विस्कळीत झाले होते. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला बिबट्याचा लपंडाव अखेर शांत झाला.शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान करमाळा तालुक्यातील वांगी नंबर ४ मध्ये पांडुरंग राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याचा वावर दिसून आला. बिबट्याचा वावर दिसून येताच वन विभागासह डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनीही सापळा रचला होता. यावेळी नरभक्षक बिबट्याने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच अतिशय सावधगिरी बाळगत धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बिबट्यावर पंधरा फुटाच्या अंतरावरून तीन गोळ्या झाडल्या यात बिबट्याचा जागीच अंत झाला.
विविध जिल्ह्यातून धुमाकूळ घालत आलेल्या या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी वन विभाग खात्याने विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये ३२ कॅमेरे, २१ पिंजरे, ४२ ट्रॅप कॅमेरा, ५ शार्प शूटर,२ बेशुद्ध करणारे पथक, एक डॉग स्कोर, अशा सोहळा टीमद्वारे रात्रंदिवस दीडशे कर्मचारी या मोहिमेत परिश्रम घेत होते. सदर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये व १७ दिवसाच्या परिश्रमानंतर बिबट्याला ठार करण्यात यश आले.
0 Comments