Ads

Ads Area

अनगरसह सात ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर ; राजधानीचा गड बिनविरोध ठेवण्यात राजन पाटील यांना यश

अनगरसह सात ग्रामपंचायती बिनविरोध होण्याच्या मार्गावर
राजधानीचा गड बिनविरोध ठेवण्यात राजन पाटील यांना यश


अनगर, कुरणवाडी, बिटले, खंडोबाचीवाडी, पासलेवाडी, गलंदवाडी, नालबंदवाडीचा समावेश

          मोहोळ (साहील शेख):- मोहोळ तालुक्याच्या राजकीय क्षेत्राची राजधानी ठरलेल्या सतरा ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या अनगर ग्रामपंचायतीने सन १९५२ पासून ते आजतागायत म्हणजे तब्बल ६८ वर्षाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा या पंचवार्षीक निवडणुकीला कायम ठेवली आहे.अनगर, कुरणवाडी, बिटले, खंडोबाचीवाडी, पासलेवाडी, गलंदवाडी, नालबंदवाडी या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  सात ग्रामपंचायतीसाठी जितक्या जागांसाठी ही निवडणूक लागली होती. तितकेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या निवडणुका बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर या निवडणुकीची बिनविरोध निवडणुकीची अधिकृत घोषणा प्रशासन स्तरावर होणार आहे. आता केवळ या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याचे जाहीर होणे केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी राहिली आहे.

          अनगरसह पंचक्रोशीतील सात गावांनी  या वेळेसही बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवत एक आगळावेगळा विक्रम मोहोळ तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये नोंदवला आहे. मोहोळ तालुक्याचे माजी आमदार तथा सहकार तपस्वी लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांनी सुरू केलेली ही संकल्पना अबाधित ठेवण्यामध्ये त्यांचे सुपुत्र तथा मोहोळ तालुक्याचे माजी आमदार मोहोळ विधानसभा मतदार संघाचे मार्गदर्शक राजन पाटील यांना यश मिळाले आहे.

          गेल्या अनेक दशकापासून लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांनी या पंचक्रोशीतील गावांना बिनविरोध निवडणुकीमुळे आणि एकोप्याने  सर्वांगीण विकासाची पंचसूत्री पटवून दिली होती. गावागावात शांतता राखणे, गावातील तंटे आपापसात मिटवून गाव तंटामुक्त ठेवणे, गावात जलसंधारणाच्या योजना राबवणे, ग्रामपंचायतीच्या करापोटी संकलित झालेल्या उत्पन्नाची ठेव रुपी बचत करणे आणि प्रशासनाच्या योजना अत्यंत पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने राबवणे या गोष्टीची शिकवण आजही अनगर पंचक्रोशीतील जनता विसरली नाही. लोकनेते अण्णांच्या नंतर माजी आमदार राजन पाटील यांनी ही बिनविरोध निवडणुकीची अभिनव चळवळ सातत्याने सुरुच ठेवली आहे. मोहोळ तालुक्यातील अनेक गावांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले खरे परंतु गाव पातळीवर समन्वय न झाल्याने बिनविरोध करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या. अनगरकरांनी मात्र गेल्या ६८ वर्षापासूनची बिनविरोध निवडणुकीची प्रथा आजही कायम ठेवली आहे.मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत तात्या माने यांनी सर्व बिनविरोध ठरलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

          लोकनेते पुज्य अण्णांनी घालून दिलेले विकासाचे संस्कार आजही अनगर पंचक्रोशीतील जनता विसरली नाही. मालकांच्या नेतृत्वाखाली आज अनगर, कुरणवाडी, बिटले, खंडोबाचीवाडी, पासलेवाडी, गलंदवाडी, नालबंदवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सर्व  मतदार बंधू-भगिनीच्या एकविचाराने बिनविरोध पार पडली. सन १९५२ सालच्या स्थापनेपासून गेली ६८ वर्ष अनगरकर -पाटील परिवाराच्या  नेतृत्वावर दाखवलेला अढळ विश्वास आजही कायम आहे याचे मनस्वी समाधान वाटते. अजोड विश्वासाची सर्वांगीण विकासाची संस्कार समृद्धीची ही परंपरा या पुढील काळातही अशीच अविरतपणे सुरू राहील असा मला विश्वास वाटतो. बिनविरोध निवडणुकीचा आदर्श निर्णयात सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या सर्वांगीण हितासाठी  अशा सर्व ग्रामपंचायतीचा कुटुंबप्रमुख या नात्याने सदैव दक्ष राहणार आहे.सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्यांचे  मनःपूर्वक अभिनंदन आणि तमाम मतदार बंधू भगिनींचे अंतःकरणपूर्वक अभार. - राजन पाटील (माजी आमदार मोहोळ)

          निवडणुकीपूर्वी गावातील प्रमुख व्यक्तींशी चर्चा करून सर्वांच्या एकमताने अत्यंत शांततेत ग्रामपंचायत सदस्यांची निवड करणे आणि लोकशाही मार्गाने उमेदवारी अर्ज दाखल करून जितक्या जागा असतील तितकेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध होण्याचा आजवरचा मार्ग सुकर होऊ शकला. मोहोळ नंतर अनगर हे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव असून तब्बल दहा हजार पेक्षाही जास्त लोकसंख्या आहे . ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या १७ असुन सात हजार मतदान असलेल्या या गावाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्वतः राजन पाटील यांनी दर वेळी प्रमाणे या वेळीही शिस्तबद्ध धोरण राबवले.

          अनगर पंचक्रोशीतील तब्बल सात ग्रामपंचायती बिनविरोध करत राजन पाटील आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव बाळराजे आणि अजिंक्यराणा यांनी लोकनेते अण्णांनी सुरू केलेली  आदर्शवत आणि उदात्त परंपरा आजही कायम ठेवल्यामुळे मोहोळ मतदारसंघातील अनेक ग्रामस्थांतून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close