Ads

Ads Area

तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे - बापूसाहेब शितोळे

तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे - बापूसाहेब शितोळे

          बार्शी (कटूसत्य वृत्त): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बार्शी शाखेच्या वतीने  व्यसनविरोधी दिन*श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे साजरा करण्यात आला. व्यसन विरोधी पोस्टरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्कृतिक विभागाचे प्रमुख मा.बापूसाहेब शितोळे म्हणाले की मद्यपान हा विकत घेतला जाणारा आजार असून या आजारामुळे आज देशातील कित्येक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातं आहेत. मद्यपानाचे व्यसन हे गरिबीचे दुष्टचक्र आहे.मद्यापानाचा तरुणांच्या जीवनावर कसा वाईट परिणाम होतो हे त्यांनी सांगितले. तरुणाईने प्रत्येक प्रकारच्या व्यसनाधीनते पासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी महाविद्यालयीन तरुण व तरुणींना केले .

          मद्याची सोडा संगत,संसाराची होईल बरकत आयुष्य संपविण्यापेक्षा धूम्रपान संपविणे कधीही चांगले ..व्यसनमुक्त महाविद्यालय हाच आमचा संकल्प  अश्याप्रकारचे घोषवाक्य असलेले पोस्टर महाविद्यालय परिसरात लावण्यात आले आहेत.

          यावेळी श्री.शिवाजी महाविद्यालयातील डॉ.टी.एन लोखंडे, समन्वयक विज्ञान विभाग, डॉ.आर.एस चाटी एन .एस. एस विभागीय समन्वयक, प्रा.संजय पाटील, डॉ.एस.सी माने, डॉ.सोमनाथ यादव एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी, प्रा.के.आर जाधव, प्रा.युवराज खुळे, प्रा.विजया गवळी,डॉ.विजयानंद निंबाळकर यांच्यासह अनेक प्राध्यापक वृंद हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यसन विरोधी प्रतिज्ञा घेतली.

          यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बार्शीचे प्रा.हेमंत शिंदे, प्रा.डॉ. अशोक कदम, वकील संघाचे अध्यक्ष काकासाहेब गुंड, उन्मेष पोतदार, स्वप्नील तुपे, सोमनाथ वेदपाठक, अतुल नलगे, अजय मोकाशी, विनायक माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंनिस शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. अशोक कदम यांनी तर सूत्रसंचलन अजय मोकाशी यांनी केले आभार सचिव विनायक माळी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close