जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

सोलापूर, (कटूसत्य वृत्त): सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) दि. 31 जानेवारी 2021 पर्यंत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
आदेशात नमुद केले आहे की, सुरक्षित शारिरीक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात स्वच्छ धुणे आणि कोविड-19 विषयीच्या सूचनांचे पालन करण्यात यावे. जिल्ह्यात सार्वजनिक हिताच्या दृष्टीने यापूर्वी देण्यात आलेल्या आदेशानुसार परवानगी व मान्यता देण्यात आलेले उपक्रम चालू राहतील.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्था, संघटनेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. अशा व्यक्ती ,संस्था, संघटना विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0 Comments