Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रस्तावांना वेळेत मंजुरी घ्यावी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

प्रस्तावांना वेळेत मंजुरी घ्यावी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

            सोलापूर, (कटूसत्य वृत्त): जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा विनियोग करण्यासाठी वेळेत प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.

            श्री. शंभरकर यांनी आज नियोजन समितीच्या निधीच्या खर्चाबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, पोलीस उपायुक्त दीपाली घाटे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते.

            श्री. शंभरकर यांनी सांगितले की, जिल्हा नियोजन समितीला राज्य शासनाने पूर्ण निधी दिला आहे. त्यामुळे दिलेला निधी वेळेत खर्च होण्यासाठी सर्व अधिकारी आणि यंत्रणांनी परिपूर्ण प्रस्ताव तयार करावेत. संबंधित प्रस्तावांना तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी घेण्यात यावी.

            श्री. दराडे यांनी प्रारंभी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणाची कार्यप्रणाली आय-पास प्रणालीव्दारे केली जात आहे. त्यामुळे सर्व प्रस्ताव या संगणक प्रणालीव्दारे पाठवावेत, असे सांगितले.

            बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, वित्त आणि लेखाधिकारी अजय पवार, शिक्षणाधिकारी संजय राठोड, कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कृषी विकास अधिकारी बेंदगुडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते, कार्यकारी अभियंता व्ही.व्ही. कदम आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments