मराठा पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन
मराठा सेवा संघ संचलित मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2021 या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन त्रिंबकराव ढेंगळे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी आर्थिक गुन्हे शाखेचे फौजदार शैलेश खेडकर, प्रसिद्ध वास्तुविशारद संतोष मोटे, चेअरमन आणि नगरसेवक अमोल बापू शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीत पतसंस्थेच्या कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच सुत्रसंचलन संचालक राम गायकवाड यांनी केले.
पतसंस्थेच्या माध्यमातून नवनवे उद्योजक आणि व्यवसायीक उभे रहावे म्हणून जे प्रयत्न केले जात आहे त्याच कौतुक मान्यवरांनी केले. अनुत्पादक ऐवजी उत्पादक कर्जदार हा फायदेशीर ठरतो. कर्जदार बरोबर ठेवीदारांचा विचार करणाऱ्या पतसंस्था उपयुक्त ठरतात असे मत त्रिंबकराव ढेंगळे पाटील यांनी व्यक्त केले. या दिनदर्शिकेचे जाहिरातदारांचा ही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रशांत पाटील, राम गायकवाड, जयंत होले पाटील, अभिराज शिंदे, अभिमन्यू जाधव, अक्षय बचुटे , सागर चव्हाण, रवी अंधारे, गरिष शेंगर, अमोल कदम, महेश खुर्द, मधुकर दुडम, विश्वजीत देशमुख, श्रीकांत शिंदे यादी मान्यवर सभासद उपस्थित होते.
0 Comments