Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आळंदी वारीसाठी परवानगी द्यावी - भाविक वारकरी मंडळ

महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आळंदी वारीसाठी परवानगी द्यावी - भाविक वारकरी मंडळ

सोलापूर (क.वृ.): वारकरी परंपरेमध्ये श्री क्षेत्र आळंदीवारी नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने सांभाळला गेला आहे. वारकरी भाविकांनी चैत्रवारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती,आषाढीवारी, श्रावण मास, अधिकमास,गणेशोत्सव, नवरात्र, कार्तिकी वारी (पंढरपूर) हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले आहेत. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले आहे. परंतु शासनाने वारकरी परंपरेला योग्य न्याय दिला नाही. सध्या कोरोनाची दुसरी लाट सांगितली जात आहे. तर काळजी म्हणून सर्व व्यवहार व गर्दी नियोजन दिसत नाही. 

फक्त वारकरी उत्सव बंद ठेवणं त्यावर निर्बंध घालणे एव्हडेच प्रयत्न चालू आहेत.  बाजार पेठे सहित सर्व दुकाने खुली केली आहेत, चित्रपट गृह, नाट्यगृह, जिम सर्व सुरु झाले आहे. तर मग कोरोनाची दुसरी लाट कुठे आहे ? असा सवाल वारकरी संघटनेने कडून करण्यात आला.  

कोणतेच क्षेत्र खुले करण्याचे राहिले नाही. रुग्ण संख्या ही खूप कमी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या आळंदी (कार्तिक) वारीमध्ये पारंपरिक वारकरी व  भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी असे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून  ईमेल द्वारे मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments