लऊळ पदवीधर मतदान केंद्रावर मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 1, 2020

लऊळ पदवीधर मतदान केंद्रावर मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

लऊळ पदवीधर मतदान केंद्रावर मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

लऊळ (क.वृ.): ता.माढा येथील पुणे विभाग पदवीधर शिक्षक मतदार केंद्रावर  विधानपरिषदेसाठी पदवीधरानी आणि शिक्षक मतदारांनी  उत्साहात मतदान केंद्रावरील ५७७ पैकी ३९७ मतदान करुन ६९% मतदान पोलींग केले. मतदान चालु असताना भारतीय जनता पार्टी चे  विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मतदान केंद्राला भेट दिली.

सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. या केंद्रावर पदवीधराचे ४८३ तर शिक्षकांचे ९५असे एकुण ५७९ मतदार होते त्यापैकी ३१७ पुरुष व स्त्री मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावुन ७७% पोलिंग झाले  तर ८० शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावुन ८४.२१% पोलिंग झाले.या झालेल्या मतदारामध्ये लऊळ, भेंड, पडसाळी, बावी, सोलंकरवाडी, उजनी मा., शिराळ (मा), पिंपळनेर, पालवण, भोईंजे, सापटणे टें, आहेरगाव, आकुंभे, व्होळे, वरवडे या गावांनी सहभाग नोंदवला. सर्व मतदान प्रक्रीया सुरळीत पार पडली मात्र सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages