मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लाडर्सवर बंदी आदेश

मुंबई, (क.वृ.): मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 30 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर 2020 या कालावधी ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणांवर बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून,या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध सेक्शन 188 भा.द.वि. 1960 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.
0 Comments